अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुका तेथील रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पक्षासाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. याच निवडणुकीत यंदा डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवारीवर अनेक भारतीयवंशाचे अमेरिकन नागरिक निवडून आले आहेत. विजय उमेदवारांमध्ये एकूण १२ भारतीयवंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकन मध्यावधी कोणत्या भारतीयवंशाच्या उमेदवारांचा विजय?

अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत विजय झालेल्या भारतीयवंशाच्या उमेदवारांमध्ये कुमार बर्वे, सॅम सिंह, मनका धिंग्रा, डॉ. अनिता सोमाणी, जेरेमी कुने, जोहरान ममदानी, जेनिफर राजकुमार, रणजीव पुरी, डॉ. वंदना श्रीनिवास, नबीला सईद, डॉ. अरविंद व्यंकट यांचा समावेश आहे.

१. कुमार बर्वे

कुमार बर्वे मेरिलँड हाऊस ऑफ डेलिगेट्सचे सदस्य आहेत. ते अमेरिकेतील राज्य कायदेमंडळात निवडून जाणारे पहिले भारतीय अमेरिकन होते. त्यांची पुन्हा निवड झाली आहे.

२. सॅम सिंह

मिशिगन राज्याचे माजी प्रतिनिधी आणि डेमोक्रेटिक पक्षाचे नेते सॅम सिंह यांचा २८ व्या मिशिगन स्टेट सिनेट डिस्ट्रिक्ट निवडणुकीत विजय झाला.

३. मनका धिंग्रा

वॉशिंग्टन स्टेट सिनेटर मनका धिंग्रा यांनी सगल तिसऱ्यांदा स्टेट सिनेट निवडणुकीत विजय मिळवला आहे.

४. डॉ. अनिता सोमाणी

डॉ. अनिता सोमाणी यांनी राज्य प्रतिनिधी निवडणुकीत ओहिओच्या ११ व्या जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाच्या ओमर ताराझी याचा पराभव केला.

५. जेरेमी कुने

जेरेमी कुने यांचा न्यू यॉर्क स्टेट सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा विजय झाला आहे.

६. जोहरान ममदानी

जोहरान ममदानी यांचा न्यू यॉर्क राज्य विधानसभेत दुसऱ्यांदा विजय झाला. यावेळी त्यांची निवडणूक बिनविरोध झाली.

७. जेनिफर राजकुमार

जेनिफर राजकुमार यांचाही न्यू यॉर्क राज्य विधानसभेत दुसऱ्यांदा विजय झाला. यावेळी त्यांची निवडणूक बिनविरोध झाली.

८. रणजीव पुरी

मिशिगन राज्य प्रतिनिधी म्हणून रणजीव पुरी यांची पुन्हा निवड झाली.

९. डॉ. वंदना स्लॅटर

डॉ. वंदना स्लॅटर यांचीही वॉशिंग्टन राज्य प्रतिनिधी म्हणून निवड झाली.

१०. डॉ. मेगन श्रीनिवास

डॉ. मेगन श्रीनिवास यांनी लोवा हाऊस डिस्ट्रिक्ट ३० निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या जेरी चीव्हर्स यांचा पराभव केला. त्या स्वाती दांडेकर यांच्यानंतर लोवा हाऊसच्या दुसऱ्या भारतीयवंशाच्या अमेरिकन महिला सदस्य आहेत.

११. नबीला सईद

२३ वर्षीय नबीला सईद या मुस्लीम भारतीयवंशाच्या अमेरिकन आहेत. त्यांचा इलिनॉईस राज्य कायदेमंडळाच्या निवडणुकीत ५१ व्या हाऊस डिस्ट्रिक्ट येथून विजय झाला. यासह त्या इलिनॉईस कायदेमंडळातील पहिल्या दक्षिण आशियायी सदस्य ठरल्या आहेत. याशिवाय त्या राज्य विधानसभेतील सर्वात तरुण सदस्यही ठरल्या आहेत.

हेही वाचा : अमेरिकेत ‘रिपब्लिकन लाट’ नाहीच; सेनेटमधील बहुमतासाठी अटीतटीची लढत, बायडेन यांना दिलासा

१२. डॉ. अरविंद व्यंकट

डॉ. अरविंद व्यंकट यांचाही पेनसिल्व्हेनिया राज्य प्रतिनिधी मंडळात विजय झाला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: List of indian americans who win in us midterm elections in important states pbs
Show comments