One Nation One Election Bill: देशभरात सध्या चर्चा चालू आहे ती एक देश एक निवडणूक अर्थात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकावर. लोकसभा व सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्रच घेण्यासंदर्भात या विधेयकात तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही एकत्र घेण्यासंदर्भात या विधेयकामध्ये तरतुदी करण्यात आल्या असून मंगळवारी हे विधेयक लोकसभेमध्ये चर्चेसाठी मांडण्यात आलं. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या विधेयकावरून खडाजंगी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर विधेयकाला समर्थन असणाऱ्या आणि विरोधात असणाऱ्या पक्षांच्या भूमिकांची चर्चा सुरू झाली आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळानं १२ डिसेंबर रोजीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर हे विधेयक लोकसभेत चर्चेसाठी मांडण्यात आलं आहे. तेव्हापासून सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाजूंनी विधेयकाच्या समर्थनार्थ व विरोधातील भूमिका मांडल्या जात आहेत. देशातील राजकीय सत्तासमीकरणं, एनडीएतील मित्रपक्ष, इंडिया आघाडीतील पक्ष, राज्याराज्यांमधील आघाड्या व त्यामधील पक्षांच्या भूमिका अशा अनेक गोष्टींच्या परिणामस्वरूप संसदेत पक्षांनी पाठिंबा वा विरोधाच्या भूमिका घेतलेल्या दिसून येतात.

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
kumar ashirwad on Markadwad
“…तर भारतात बांगलादेशसारखी स्थिती झाली असती”, मारकडवाडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट
markadwadi villagers marathi news
मारकडवाडी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक, रामदास आठवले यांची भूमिका
Former Prime Minister Of India Narasimha Rao and Manmohan Singh.
Cash In Parliament : नरसिंह रावांपासून ते मनमोहन सिंग सरकारपर्यंत… संसदेत कधी कधी सापडली कॅश? एका नेत्याला झाला होता तुरुंगवास 
jalgaon evm machines
जळगावमध्ये ईव्हीएम विरोधात मोर्चा

वन नेशन, वन इलेक्शनला पाठिंबा व विरोध असणारे पक्ष…

संख्यापाठिंबा असणारे पक्षविरोध असणारे पक्ष
भारतीय जनता पक्षकाँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार)आम आदमी पक्ष
शिवसेना (एकनाथ शिंदे)बहुजन समाज पार्टी
अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमकम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट)
जनता दलसमाजवादी पक्ष
नॅशनल पीपल्स पार्टीऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट
अपना दलतृणमूल काँग्रेस
ऑल झारखंड स्टुडेंट्स यूनियनऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम)
आसाम गण परिषदकम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
१०बिजू जनता दलद्रविड मुन्नेत्र कळघम
११लोक जनशक्ती पार्टी (आर)नागा पीपल्स फ्रंट
१२मिझो नॅशनल फ्रंटविदुथलाई चिरुथैगल कटची
१३नॅशनल डेमॅक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमरुमलारची द्रविड मुन्नेत्र कळघम
१४शिरोमणी अकाली दलकम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया लिबरेशन (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट)
१५युनायडेट पीपल्स पार्टी लिबरलसोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया
१६पत्तली मक्कल कटची
१७रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)
१८तामिल मनिला काँग्रेस (एम)
१९राष्ट्रीय लोक जनता दल
२०युनायटेड किसान विकास पार्टी
२१भारतीय समाज पार्टी
२२गोरखा नॅशनल लिबरल फ्रंट
२३हिंदुस्तानी आवाम मोर्चा
२४इंडियन मक्कल कलवी मुन्नेत्र कळघम
२५इंडिजिनियस पीपल्स फ्रंट त्रिपुरा
२६जनसुराज्य शक्ती
२७राष्ट्रीय लोक जन शक्ती पार्टी
२८महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी
२९निशाद पार्टी
३०पुथिया निधी कटची
३१डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी
३२सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा

संख्येचा विचार केल्यास भाजपासहीत एकूण ३२ पक्षांचा एक देश, एक निवडणूक विधेयकाला पाठिंबा असून १५ पक्षांचा या विधेयकाला विरोध आहे.

Story img Loader