पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या चंदिगड येथील निवासस्थान परिसरात बॉम्बशेल आढळला आहे. या घटनेची माहिती होताच पोलीस तसेच बॉम्बशोधक पथक या परिसरात दाखल झाले आहे. पोलिसांनी बॉम्बशेल आढळलेला परिसर सील केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी बॉम्बशेल आढळला आहे, तेथून पंजाब आणि हरियाणा अशा दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याचे निवासस्थान जवळच आहे.

हा बॉम्बशेल आंब्याची बाग असलेल्या परिसरात आढळला आहे. हा भाग पंजाब आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडपासून १ किमी अंतरावर तर भगवंत मान यांच्या निवासस्थानापासून २ किमी अंतरावर आहे.

“या भागात एक जिवंत बॉम्बशेल आढळला आहे. या घटनेनंतर येथे पोलीस आणि बॉम्बशोधक पथक दाखल झाले. त्यांच्या मदतीने हा बॉम्बशेल निकामी करण्यात आला आहे. या परिसराती नाकेबंदी करण्यात आली आहे. बॉम्बशेल येथे कसा आला, याचा शोध घेतला जात असून अधिक तपास सुरू आहे,” अशी माहिती चंदिगडमधील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी संजीव कोहली यांनी सांगितले आहे.

Story img Loader