सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनचा (सीबीएसई) १२ वीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यंदाच्या निकालांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. १ मार्च ते २२ एप्रिल २०१६ या कालावधीत घेण्यात आलेल्या या परीक्षेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८८.५८ तर मुलांचे प्रमाण ७८.८५ इतके आहे. १०,६७,९०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. दिल्लीच्या सुकृती गुप्ता हिने या परीक्षेत ५०० पैकी ४९७ गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. सीबीएसईचे विद्यार्थी http://www.results.nic.in, http://www.cbseresults.nic.in आणि http://www.cbse.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा