भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिल्लीतील रोहिणी भागात जॅपनीज पार्क येथील सभेत काँग्रेस सरकारवर चौफेर टीका केली. पंतप्रधानांवर निशाणा साधत पंतप्रधान ‘सरदार’ आहेत, पण ‘असरदार’ नसल्याचे म्हणत सभेत ‘बदलेंगे दिल्ली, बदलो भारत’च्या नाऱयाची गर्जना यावेळी मोदींनी केली.  “मनमोहन सिंग बराक ओबामांसमोर गुडघे टेकतात. त्यांनी अमेरिकेत जाऊन देशातील गरिबांचे मार्केटींग केले ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. त्याऐवजी भारत हा तरुणांचा देश असल्याचे पंतप्रधान ओबामांजवळ का बोलत नाहीत?” असा घणाघाती सवालही मोदींनी उपस्थित केला.
‘भारत लोकशाहीवर चालणार की, युवराजांच्या इच्छेवर?’ असे म्हणत मोदींनी राहुल गांधीवरही टीकास्त्र सोडले.
“आघाडी सरकारचा एकमेकांशी ताळमेळ नाही. दिल्लीवर एकाचवेळी अनेक जण राज्य करत आहेत. तरीसुद्धा दिल्लीला आज कोण वाली उरलेला नाही.” तसेच “दिल्लीत एक आईचं सरकार आणि दुसरं मुलाचं शासन सूरू” असल्याचे म्हणत मोदींनी सोनिया व राहूल गांधीवर टीकेचा सुर उमटवला.
दिल्लीच्या मुख्यमंत्री देशातील सर्वात असंवेदनशील नेत्या असल्याचे म्हणत दिल्लीतील शासन आता बदलण्याची वेळ आली असल्याचेही मोदी म्हणाले.

मोदी टीकास्त्र
* काँग्रेसला भष्ट्रचाराचे व्यसन लागले आहे
* कॉमनवेल्थ घोटाळ्याने देशाची अब्रू लुटली
* केंद्र सरकार लकवाग्रस्त; कामच करत नाही
* दिल्लीत एवढी सरकारं असूनही दिल्लीला वाली नाही
* काँग्रेसचे प्रत्येक मुख्यमंत्री जबाबदारी झटकतात
* अमेरिकेत जाऊन पंतप्रधानांनी देशातील गरिबांचे मार्केटींग केले ही लज्जास्पद गोष्ट
* काँग्रेसच्या पंतप्रधानांना पक्षातच काही किंमत राहिलेली नाही

गडकरींकडून मोदी यांना हिऱ्यांचा हार!
या सभेसाठी स्थानिक भाजप नेत्यांनी प्रचंड खर्च व गाजावाजा केला. परंतु, सभेला पक्षाच्या श्रेष्ठींनी पाठ फिरविल्याचे दिसले. पक्षाचे माजी अध्यश्र नितीन गडकरी तसेच दिल्लीतील स्थानिक भाजप नेत्यांना वगळता इतर कोणत्याही ज्येष्ठ नेत्यांनी सभेला अजून उपस्थिती लावलेली नाही.
पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्यानंतर मोदींची दिल्लीतील ही पहिलीच जाहीर सभा आहे.
शंभराच्या नोटांवर नरेंद्र मोदी यांचा प्रचार!

Story img Loader