भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिल्लीतील रोहिणी भागात जॅपनीज पार्क येथील सभेत काँग्रेस सरकारवर चौफेर टीका केली. पंतप्रधानांवर निशाणा साधत पंतप्रधान ‘सरदार’ आहेत, पण ‘असरदार’ नसल्याचे म्हणत सभेत ‘बदलेंगे दिल्ली, बदलो भारत’च्या नाऱयाची गर्जना यावेळी मोदींनी केली. “मनमोहन सिंग बराक ओबामांसमोर गुडघे टेकतात. त्यांनी अमेरिकेत जाऊन देशातील गरिबांचे मार्केटींग केले ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. त्याऐवजी भारत हा तरुणांचा देश असल्याचे पंतप्रधान ओबामांजवळ का बोलत नाहीत?” असा घणाघाती सवालही मोदींनी उपस्थित केला.
‘भारत लोकशाहीवर चालणार की, युवराजांच्या इच्छेवर?’ असे म्हणत मोदींनी राहुल गांधीवरही टीकास्त्र सोडले.
“आघाडी सरकारचा एकमेकांशी ताळमेळ नाही. दिल्लीवर एकाचवेळी अनेक जण राज्य करत आहेत. तरीसुद्धा दिल्लीला आज कोण वाली उरलेला नाही.” तसेच “दिल्लीत एक आईचं सरकार आणि दुसरं मुलाचं शासन सूरू” असल्याचे म्हणत मोदींनी सोनिया व राहूल गांधीवर टीकेचा सुर उमटवला.
दिल्लीच्या मुख्यमंत्री देशातील सर्वात असंवेदनशील नेत्या असल्याचे म्हणत दिल्लीतील शासन आता बदलण्याची वेळ आली असल्याचेही मोदी म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा