जर्मनीच्या व्हिअर्नहेईम भागातील एका चित्रपटगृहात गुरूवारी एका अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आलेल्या अंदाधुंद गोळीबारात किमान २० जण जखमी झाले आहेत. येथील किनोपोलिस चित्रपटगृहात हा प्रकार घडला. तोंडावर मास्क घातलेल्या या अज्ञात व्यक्तीने चित्रपटगृहात शिरल्यानंतर किमान एक राऊंड फायर केला. त्याच्याकडे शस्त्रास्त्रांचा बराच साठा आहे. हल्लेखोराने याठिकाणी अश्रुधूर ही सोडला. त्यामुळे झालेल्या पळापळीत अनेकजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ‘ब्लीड डेली’च्या वृत्तानुसार, घटनेनंतर या परिसराला पोलिसांनी घेरले आहे. जर्मन प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार हल्लेखोर मारला गेला आहे. मात्र, यापर्यंत अद्याप स्पष्टता नाही.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 23-06-2016 at 21:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live several wounded in shooting at cinema complex in germany say reports