Budget 2021: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी तिप्पट तरतूद करण्यात आलेली असून दोन लाख २३ हजार ८४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याआधी ही तरतूद ९४ हजार कोटी इतकी होती. याशिवाय करोना लसीकरणासाठी अर्थसंकल्पात ३५ हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. तसंच अजून दोन करोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर झाला आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प होता. तसंच पहिल्यांदाच पेपरलेस बजेट सादर करण्यात आलं असून केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून ‘मेक इन इंडिया’ टॅबचा वापर करण्यात आला.
Live Blog

Highlights
केंद्रीय अर्थसंकल्पावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी उपहासात्मक टीका केली आहे.
४) मनुष्यबळाचे खच्चीकरण
— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 1, 2021
५) अर्थव्यवस्था उद्ध्वस्त आणि नष्ट करण्याची पुनरावृत्ती
६) कमाल आश्वासने किमान कामगिरी#Budget2021 #SixPillars
...२/२
"महाराष्ट्र व मुंबईतून देशाला सगळ्यात जास्त महसूल मिळतो. परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पात काहीही मिळालेलं नाही. महाराष्ट्रानं देशाला देण्याची दानत दाखवली आहे. पण महाराष्ट्रावर मात्र नेहमी अन्याय होत आलेला आहे. आकडे अर्थमंत्री देत आहेत. त्यातले किती आकडे खरे आहेत किती खोटे आहेत हे सहा महिन्यात कळेल. अर्थसकल्प कोणाचाही असेल पण थापा मारणं बंद केलं पाहिजे," अशी टीका संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. पश्चिम बंगाल, केरळ व दक्षिणेकडच्या राज्यांसाठी असलेल्या आर्थिक तरतुदींसदर्भात बोलताना राऊत यांनी हा देशाचा नसून एका राजकीय पक्षाचा अर्थसंकल्प असल्याची टीका केली.
बजेट सादर झाल्यानंतर आम आदमी पक्षाने ट्विटरच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे मोदी सरकावर निशणा साधला आहे.
🔸रेल बेच देंगे
— AAP (@AamAadmiParty) February 1, 2021
🔸सड़क बेच देंगे
🔸एयरपोर्ट बेच देंगे
🔸बिजली बेच देंगे
🔸किसानी बेच देंगे
🔸वेयरहाउस बेच देंगे
लेकिन मित्रों,
सौगंध मुझे इस मिट्टी की
मैं देश नहीं बिकने दूंगा! 🇮🇳
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ११ वाजता सुरु केलेलं अर्थसंकल्प वाचन १२ वाजून ५० मिनिटांनी थांबवलं. २०२० मध्ये त्यांनी दोन तास ४२ मिनिटं (१६२ मिनिटं) भाषण केलं होतं. दोन पानं शिल्लक असतानाच अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी आपलं भाषण थांबवलं होतं.
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी अर्थसंकल्पावर बोचरी टीका केली असून भाजपा सरकारचा उल्लेख मेकॅनिक असा केला आहे. ट्विट करत ते म्हणाले आहेत की, "भाजपाचं हे सरकार मला गॅरेज मेकॅनिकची आठवण करुन देत आहे जो आपल्या ग्राहकाला ब्रेक नीट करु शकत नाही म्हणून हॉर्नचा आवाज वाढवला असल्याचं सांगतो".
This BJP government reminds me of the garage mechanic who told his client, “I couldn’t fix your brakes, so I made your horn louder.” #Budget2021
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 1, 2021
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत २०२१-२२ वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर होत असताना, अनेकांचे लक्ष करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सरकार किती रक्कमेची तरतूद करणार? याकडे लागले होते. सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी करोना प्रतिबंधक लसीकरण आवश्यक आहे. वाचा संपूर्ण बातमी.
जुन्या कर प्रकरणातल्या तपासासाठी सहा ऐवजी तीन वर्षांचे रेकॉर्ड तपासले जाणार - निर्मला सीतारामन
I propose to reduce the time limit for reopening of assessments (tax assessments) to 3 years from the present 6 years: FM Nirmala Sitharaman#UnionBudget pic.twitter.com/jTa53F2lPv
— ANI (@ANI) February 1, 2021
बजेटमध्ये नाशिक आणि नागपूरकरांसाठी घोषणा करण्यात आल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्रासाठी निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली असून नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.
Congratulations Nashik!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 1, 2021
Congratulations Nagpur!
We are happy that GoI appreciates our innovative approach & accepts model of #NashikMetro as a National Project.
Not only this, but Nashik metro model will be implemented in other Indian cities too.#AatmanirbharBharatKaBudget
७५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना आयटी रिटर्नपासून मुक्ती, निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा. ७५ वर्षांवरील नागरिकांना पेन्शमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर रिटर्न भरण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलं आहे.
We shall reduce the compliance burden on our senior citizens who are 75 years of age & above - for senior citizens who only have pension & interest income, I propose exemption from filing their Income Tax return: FM Nirmala Sitharaman. #Budget2021 pic.twitter.com/ckBMpF0Tpj
— ANI (@ANI) February 1, 2021
आत्मनिर्भर स्वास्थ योजनेंतर्गत चार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीची (एनआयव्ही) स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पादरम्यान केली. देशात सध्या पुणे शहरात एकमेव एनआयव्ही अस्तित्वात आहे.
आमचं सरकार शेतकरी हितासाठी वचनबद्ध आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दीष्ट असून गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरता तरतूद असल्याची निर्मला सीतारामन यांची माहिती. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांच्या मोठ्या घोषणा.
Our Govt is committed to the welfare of farmers. The MSP regime has undergone a change to assure price that is at least 1.5 times the cost of production across all commodities: Finance Minister Nirmala Sitharaman #UnionBudget pic.twitter.com/WL93H0M4xL
— ANI (@ANI) February 1, 2021
२०१२ मध्ये शेतकऱ्यांना किमान हमीभावापोटी ३३ हजार कोटी रुपये दिले होते, २०१५ मध्ये शेतकऱ्यांना ५२ हजार कोटी रुपये दिले तर २०२०-२१ मध्ये हा आकडा ७५ हजार कोटी वाढला. गव्हाचं उत्पादन घेणाऱ्या ४३ लाख शेतकऱ्यांना फायदा झालाय - निर्मला सीतारामन
यावर्षी एलआयसी कंपनीचा आयपीओ बाजारात येणार - निर्मला सीतारामन
In 2021-22 we would also bring the IPO of LIC for which I am bringing the requisite amendments in this session itself: Finance Minister Nirmala Sitharaman #UnionBudget pic.twitter.com/NifUTtlCku
— ANI (@ANI) February 1, 2021
विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून वाढवून ७४ टक्के करणार - निर्मला सीतारामन
I propose to amend the Insurance Act 1938 to increase the permissible FDI limit from 49% to 74% in insurance companies and allow foreign ownership & control with safeguards: Finance Minister Nirmala Sitharaman. #Budget2021 pic.twitter.com/c9WHDH4CQ2
— ANI (@ANI) February 1, 2021
तामिळनाडू, केरळ आणि आसाममध्ये महामार्गांच्या कामांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. आगामी काळात येथे निवडणुका होणार आहेत. याशिवाय पश्चिम बंगालमधील महामार्गांसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
Highlights
केंद्रीय अर्थसंकल्पावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी उपहासात्मक टीका केली आहे.
"महाराष्ट्र व मुंबईतून देशाला सगळ्यात जास्त महसूल मिळतो. परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पात काहीही मिळालेलं नाही. महाराष्ट्रानं देशाला देण्याची दानत दाखवली आहे. पण महाराष्ट्रावर मात्र नेहमी अन्याय होत आलेला आहे. आकडे अर्थमंत्री देत आहेत. त्यातले किती आकडे खरे आहेत किती खोटे आहेत हे सहा महिन्यात कळेल. अर्थसकल्प कोणाचाही असेल पण थापा मारणं बंद केलं पाहिजे," अशी टीका संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. पश्चिम बंगाल, केरळ व दक्षिणेकडच्या राज्यांसाठी असलेल्या आर्थिक तरतुदींसदर्भात बोलताना राऊत यांनी हा देशाचा नसून एका राजकीय पक्षाचा अर्थसंकल्प असल्याची टीका केली.
बजेट सादर झाल्यानंतर आम आदमी पक्षाने ट्विटरच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे मोदी सरकावर निशणा साधला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ११ वाजता सुरु केलेलं अर्थसंकल्प वाचन १२ वाजून ५० मिनिटांनी थांबवलं. २०२० मध्ये त्यांनी दोन तास ४२ मिनिटं (१६२ मिनिटं) भाषण केलं होतं. दोन पानं शिल्लक असतानाच अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी आपलं भाषण थांबवलं होतं.
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी अर्थसंकल्पावर बोचरी टीका केली असून भाजपा सरकारचा उल्लेख मेकॅनिक असा केला आहे. ट्विट करत ते म्हणाले आहेत की, "भाजपाचं हे सरकार मला गॅरेज मेकॅनिकची आठवण करुन देत आहे जो आपल्या ग्राहकाला ब्रेक नीट करु शकत नाही म्हणून हॉर्नचा आवाज वाढवला असल्याचं सांगतो".
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताच शेअर बाजारात मोठी उसळी पहायला मिळाली असून सेन्सेक्स १५०० अंकांनी वधारला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत २०२१-२२ वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर होत असताना, अनेकांचे लक्ष करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सरकार किती रक्कमेची तरतूद करणार? याकडे लागले होते. सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी करोना प्रतिबंधक लसीकरण आवश्यक आहे. वाचा संपूर्ण बातमी.
आयकराच्या संरचनेसंदर्भात कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नसून बजेटकडे लक्ष लागलेल्या सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मिळालेला नाही. आयकराच्या संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
एनआरआय नागरिकांना दुहेरी कर प्रणालीतून दिलासा देण्याचा निर्णय - निर्मला सीतारामन
जुन्या कर प्रकरणातल्या तपासासाठी सहा ऐवजी तीन वर्षांचे रेकॉर्ड तपासले जाणार - निर्मला सीतारामन
२०२० मध्ये रेकॉर्डब्रेक ६ कोटी ४८ लाख लोकांनी आयकर रिटर्न भरल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
करोनामुळे सरकारसमोर मोठं आर्थिक आव्हान असून ८० हजार कोटींच्या निधीची गरज असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. ८० हजार कोटींचा निधी जमा करण्यासाठी अनेक योजना असल्याची माहितीही त्यांनी दिली.
टॅक्स ऑडिटची मर्यादा पाच कोटींवरुन १० कोटींवर - निर्मला सीतारामन
गुंतवणूक वाढवण्यासाठी कॉर्पोरेट करात कपात करण्याचा निर्णय - निर्मला सीतारामऩ
बजेटमध्ये नाशिक आणि नागपूरकरांसाठी घोषणा करण्यात आल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्रासाठी निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली असून नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.
७५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना आयटी रिटर्नपासून मुक्ती, निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा. ७५ वर्षांवरील नागरिकांना पेन्शमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर रिटर्न भरण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलं आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली डिजिटल जणगणना करण्यात येणार आहे. यासाठी तीन हजार ६८ कोटींची तरतूद करण्यात येणार आहे - निर्मला सीतारामन
२०२०-२१ मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या ९.५ टक्के - निर्मला सीतारामन
डिजिटल व्यवहारास चालना देण्यासाठी केंद्र सरकराने १५०० कोटींची तरतूद केली जाणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
आत्मनिर्भर स्वास्थ योजनेंतर्गत चार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीची (एनआयव्ही) स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पादरम्यान केली. देशात सध्या पुणे शहरात एकमेव एनआयव्ही अस्तित्वात आहे.
गोवामुक्तीला ६० वर्षपूर्तीनिमित्त ३०० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार - निर्मला सीतारामन
१०० नव्या सैनिक स्कूलची अर्थमंत्र्यांनी घोषणा केली आहे.
किमान वेतन कायदा सर्व क्षेत्रांमध्ये लागू करण्यात येणार - निर्मला सीतारामन
उज्ज्वला योजना १ कोटी अजून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणार. गॅस वितरण नेटवर्कमध्ये पुढील तीन वर्षात अजून १०० जिल्हे जोडणार आहोत. जम्मू काश्मीरमध्ये गॅस पाइपलाइन प्रोजेक्ट सुरु केला जाईल - निर्मला सीतारामन
असंघटित मजुरांसाठी ऑनलाइन पोर्टल तयार करणार - निर्मला सीतारामन
आमचं सरकार शेतकरी हितासाठी वचनबद्ध आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दीष्ट असून गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरता तरतूद असल्याची निर्मला सीतारामन यांची माहिती. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांच्या मोठ्या घोषणा.
२०१२ मध्ये शेतकऱ्यांना किमान हमीभावापोटी ३३ हजार कोटी रुपये दिले होते, २०१५ मध्ये शेतकऱ्यांना ५२ हजार कोटी रुपये दिले तर २०२०-२१ मध्ये हा आकडा ७५ हजार कोटी वाढला. गव्हाचं उत्पादन घेणाऱ्या ४३ लाख शेतकऱ्यांना फायदा झालाय - निर्मला सीतारामन
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांचा उल्लेख करताच विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी घोषणाबाजीदेखील करण्यात आली.
बँकांमधील लोकांचा पैसा सुरक्षित राहावा यासाठी सरकारी बँकांसाठी २० हजार कोटींची तरतूद: निर्मला सीतारमण
यावर्षी एलआयसी कंपनीचा आयपीओ बाजारात येणार - निर्मला सीतारामन
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेटचं वाचन करत असताना शेअर बाजाराकडून बजेटचं स्वागत केलं जात असल्याचं चित्र आहे. सकाळी बाजार उघडताच ४०१ अंकांनी वधारलेला सेन्सेक्स आता ८०० अंकांनी वधारला आहे.
सरकारी बँका सक्षम करण्यासाठी २० हजार कोटी रुपयांच्या भांडवलाची तरतूद - निर्मला सीतारामन
महाराष्ट्रासाठी निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली असून नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.
विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून वाढवून ७४ टक्के करणार - निर्मला सीतारामन
निर्मला सीतारामन यांनी जुन्या वाहनांसाठी 'स्क्रॅपिंग पॉलिसी' जाहीर केली आहे. २० वर्षांनी खासगी वाहनांसाठी तर व्यवसायिक वाहनांची १५ वर्षांनी फिटनेस टेस्ट होईल अशी माहिती त्यांनी दिली.
तामिळनाडू, केरळ आणि आसाममध्ये महामार्गांच्या कामांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. आगामी काळात येथे निवडणुका होणार आहेत. याशिवाय पश्चिम बंगालमधील महामार्गांसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक लाख ७८ हजार कोटींचा निधी - निर्मला सीतारामन
मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद - निर्मला सीतारामन
२०३० पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य डोळ्यांसमोर असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. रेल्वेला पायाभूत सुविधांसाठी १.१० लाख कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीची तरतूद असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरात गॅस पाइपलाइनचा विस्तार करणार - निर्मला सीतारामन