लडाखमध्ये लोकशाही हवी ही आमची मागणी आहे. मात्र केंद्र सरकार बरोबरच्या दोन चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. त्यामुळे आता मी उपोषणाला बसलो आहे असं मॅगेसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी म्हटलं आहे. लडाख चार वर्षांपासून राष्ट्रपती राजवटीत आहे, आम्हाला या ठिकाणी लोकशाही हवी आहे. याबाबतचं लिखित आश्वासन आम्हाला सरकारने दिलं होतं. अद्याप ते आश्वासन पूर्ण झालेलं नाही, असं म्हणत वांगचुक यांनी खंत व्यक्त केली आहे.

सोनम वांगचुक काय म्हणाले?

“माझी शुगर लेव्हल कमी झाली आहे त्यामुळे माझी तपासणी सुरु आहे. मी पाच दिवसांपासून अन्न घेतलेलं नाही. त्यामुळे हे होणारच आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी अनेक लोक इथे आले होते. आता लडाखच्या समर्थनासाठी तुम्हीही पुढच्या रविवारी अनेक लोक येतील आणि उपोषण करतील. लडाखसारख्या भागाला कायमस्वरुपी राष्ट्रपती राजवटीमध्ये ठेवणं हे आम्हाला अपेक्षित नाही. सत्याच्या लढाईला सगळे साथ देतील असं मला वाटलं.”

लक्षवेधी लढत : यशोमती ठाकूर यांच्यासमोर भाजपचे आव्हान
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
लक्षवेधी लढत : लेकीपेक्षा एकनाथ खडसेंची प्रतिष्ठा पणास
gold prices dropping post Diwali it will reach 70000 per 10 grams soon
सोन्याचे दर ७० हजारांपर्यंत येणार? आणखी मोठी घसरण…
What Justice Chandiwal Said About Sachin Waze?
Justice Chandiwal : जस्टिस चांदिवाल यांचं वक्तव्य, “सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, त्यांनी मला समित देशमुखांचा मेसेज..”
Justice Chandiwal Said This Thing About Devendra Fadnavis
Justice Chandiwal : “सचिन वाझे आणि अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न केला, मी..”, जस्टिस चांदिवाल यांचा खुलासा
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ

मिथ्यमेव जयते हा नारा…

सोनम वांगचुक पुढे म्हणाले, “सत्यमेव जयते हे आपण म्हणतो त्यामुळे जर आमचा लढा सत्यासाठीच आहे. सत्याचा विजय झाला पाहिजे. अन्याय करणाऱ्या इतकाच तो सहन करणाराही जबाबदार असतो त्यामुळे मी आवाज उठवला आहे. खोटी आश्वासनं आता पुरे झाली.. मिथ्यमेव जयते म्हणजे असत्याचा विजय असो असं म्हणायची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून मी आवाज उठवला आहे. आत्तापर्यंत अनेकदा जाहीरनामे, वचननामे यामध्ये आश्वासनं देण्यात आली. मात्र लडाख लोकशाहीपासून वंचित आहे. त्यामुळे लडाखसाठीची लढाई आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आत्ताचं सरकार हे प्रभू श्रीरामावर विश्वास ठेवणारं आहे त्यामुळे राम फक्त मूर्तीमध्ये नाही तर वचनपूर्ती करण्यात आहे हे त्यांना माहीत आहे. रघुकुल रिती सदा चली आयी प्राण जाये पर वचन न जायी.. हे सरकारला ठाऊक आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे की सरकार वचनपुर्ती करेल. पुढच्या रविवारी सगळ्या शहरांमधले लोक आम्हाला पाठिंबा देतील अशी आशा आहे” असं सोनम वांगचुक यांनी म्हटलं आहे.

नेमक्या मागण्या काय आहेत?

लडाखमध्ये लोकशाही यावी ही लडाखवासीयांची सर्वात मोठी मागणी आहे. त्यासाठी लडाखचा समावेश सहाव्या सूचीत केला जावा असं झालं तर लडाखला घटनात्मक सुरक्षा मिळेल. तसंच लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जावा ही दुसरी मागणी आहे. अनुच्छेत ३७० असल्याने लडाखला घटनात्मक सुरक्षा प्राप्त झाली होती. आता मात्र ती परिस्थिती नाही. लडाखमधले कार्यकर्ते लडाखचा समावेश सहाव्या सूचीत करावा अशी मागणी करत आहेत. मॅगेसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी यासाठी उपोषण सुरु केलं आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये रामाच्या वचनाची आठवण केंद्र सरकारला करुन देत आहेत.