गेल्या काही दिवसांपासून भारताचं नंदनवन दंग्यानी धुमसतंय. हा दंगा आणखी वाढू नये यासाठी काश्मिरच्या अनेक भागात कर्फ्यू लावला आहे. असे असतानाही आपल्या जीवाची पर्वा न करता इथले काही स्थानिक मुस्लिम जखमी भाविकांच्या मदतीसाठी धावून गेले. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांना घेऊन निघालेल्या बसला बिजबेहरा गावाजळ जम्मू काश्मिर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर 20 भाविक गंभीर जखमी झाले. कर्फ्यूमुळे या परिसरात शुकशुकाट आहे त्यामुळे मदतीसाठी तिष्ठत राहिलेल्या जखमींना मदत करण्यासाठी अनेक स्थानिक मुस्लिम धावून गेले आणि वेळीच जखमींना रुग्णालयात दाखल केले.
काश्मिरमध्ये उसळलेल्या दंग्यामध्ये याच गावातील 2 लोक मारले गेले होते. पण आपले दु:ख बाजूला ठेवून या गावातील अनेकजण अपघाताची बातमी समजताच हिंदू भाविकांच्या मदतीला धावून गेले.