अवघ्या काही दिवसांत जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड होणार आहे. मतदान प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प व हिलरी क्लिंटन हे प्रचारात एकमेकांवर तुटून पडत आहेत. प्रचारात एकमेकांवर कुरघोडी करत असताना अमेरिकेतील भारतीय मते आपल्यालाच पडावीत यासाठी त्यांनी अक्षरश: जिवाचे रान केले. अमेरिकेत राजकीय वातावरण गरम असताना इकडे हजारो किलोमीटर दूर उत्तर प्रदेशमधील एका खेडेगावात मात्र राष्ट्राध्यक्षपदी हिलरी क्लिंटनच निवडून याव्यात म्हणून ग्रामस्थांनी यज्ञ सुरू केला आहे. गावातील शेकडो नागरिक हिलरी क्लिंटन यांचा फोटो घेऊन पुजेस बसले आहेत. हे गाव आहे उत्तर प्रदेशमधील जबरौली. जबरौली गावाच्या विकासासाठी क्लिंटन फाऊंडेशनने दत्तक घेतले आहे.
क्लिंटन फाउंडेशनच्या वतीने गावात विविध विकासकामे केली जात आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी हिलरीच विजयी व्हाव्यात असे वाटते. त्यामुळे गावातील मध्यवर्ती भागात यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थ तेथे बसून प्रार्थना करत आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांचा या निवडणुकीशी काडीचा संबंध नाही फक्त आपल्या गावाच्या विकासासाठी क्लिंटन फांउडेशन करत असलेल्या मदतीपोटी हिलरींच्या बाजूने ते उभे राहिले आहेत.

Story img Loader