गेल्या वर्षी म्हणजेच २०२०मध्ये संपूर्ण देशानं कडकडीत लॉकडाऊनचा अनुभव घेतला आहे. या काळामध्ये जीवनावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्यात आलं होतं. या काळामध्ये रेल्वेकडून विशेष सेवा म्हणून अनेक फेऱ्या चालवण्यात आल्या. ठिकठिकाणी अडकलेल्या मजुरांसाठी देखील रेल्वे सेवा सुरू होती. लॉकडाऊनमध्येच गेलेल्या गेल्या वर्षभरात रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल आता केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देशभरातल्या सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना खुलं पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांचं कौतुक करतानाच रेल्वेनं लॉकडाऊन असतानाही दिलेल्या सेवेबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.

तुमच्या जिद्दीमुळेच हे शक्य झालं!

piyush goyal video viral
“भारताने जर्मन उपकरणांची खरेदी करणं थांबवलं पाहिजे”, पीयूष गोयल यांची जर्मनीच्या व्हाइस चान्सलर यांना तंबी; दिल्ली मेट्रोतील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
abhijeet kelkar stuck in the traffic on ghodbunder road
“ट्रक उलटून माझा मृत्यू झाला तर…”, घोडबंदर मार्गाने प्रवास करणारा अभिनेता संतापला; म्हणाला, “घाणेरड्या रस्त्यांमुळे…”
woman dies after falling from local train Incident between ambernath badlapur station
लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू ; अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यानची घटना
Rohit Pawar
Rohit Pawar : खेड-शिवापूरमध्ये ५ कोटींची रक्कम जप्त, रोहित पवारांनी व्हिडीओ शेअर करत सत्ताधाऱ्यांना दिला इशारा; म्हणाले, “लक्षात ठेवावं…”
nikki tamboli on varsha usgaonkar
“मी स्पष्टीकरण देण्यासाठी जन्मलेले नाही”, निक्की तांबोळीचे वर्षा उसगांवकरांबद्दल स्पष्ट वक्तव्य; म्हणाली, “त्यांचे पाय धरून…”
Hadapsar, nana bhangire, activists on the streets,
नेत्याच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत शिवसैनिक पायी निघाले, वाचा सविस्तर…
Man distracted by phone narrowly escapes train collision video goes viral
“जीव एवढा स्वस्त आहे का?” मोबाइल बघत रेल्वे रुळ ओलांडत होता तरुण, तेवढ्यात भरधाव वेगाने आली ट्रेन अन्…;Video Viral

या पत्रात पियुष गोयल यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप टाकली. “कोविड-१९ च्या काळात आपल्या रेल्वेनं देशाच्या सेवेसाठी स्वत:ला झोकून दिलं. जेव्हा सारं जग थांबलं होतं, तेव्हा तुम्ही एकही दिवसाची सुटी न घेता अर्थव्यवस्था चालती ठेवण्यासाठी अतिजोखमीच्या वातावरणात काम करत राहिलात. तुमच्यामुळेच आपण करोना काळातही देशभरात जीवनावश्यक गोष्टींचा अविरत पुरवठा करू शकलो”, असं गोयल यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

 

६३ लाख नागरिकांचं स्थलांतर!

“करोना काळात देशभरात अडकलेल्या तब्बल ६३ लाख नागरिकांची पुन्हा त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घडवून आणण्याचं काम आपण केलं. यासाठी आपण ४ हजार ६२१ श्रमिक स्पेशल ट्रेन देखील चालवल्या. ३७० मोठी कामं आपण पूर्ण केली. शेतकऱ्यांचा माल थेट बाजारपेठेपर्यंत जाण्यासाठी किसान रेल सर्विसनं मोठा वाटा उचलला आहे. यातून तुम्हा लाखो देशवासीयांच्या मनात स्थान मिळवलं आहे”, असं म्हणत गोयल यांनी पत्रातून रेल्वे कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं.

शेवटी या सर्व कर्मचाऱ्याचे आभार देखील रेल्वेमंत्र्यांनी मानले आहेत. “तुमची निष्ठा आणि जबरदस्त कामगिरीसाठी मी तुमचे आभार मानतो. या आत्मविश्वासाने भारलेल्या टीमसोबत आपण अजून अनेक विक्रम मोडणार आहोत, मोठमोठी लक्ष्य गाठणार आहोत, इतरांसमोर आदर्श ठेवणार आहोत आणि भारतीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान देणार आहोत”, असं गोयल यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.