सर्वपक्षीय सदस्यांचा गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज बुधवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. वेगळा तेलंगणा, भाववाढ आणि मुझफ्फरनगरमधील दंगलग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवाऱयाच्या ठिकाणी ४० मुलांची झालेल्या हत्या या सर्व विषयांवरून वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या सदस्यांनी सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यापासून घोषणा देण्यास सुरुवात केली. सदस्यांच्या घोषणाबाजीमुळे आणि काही सदस्यांनी आपल्या मागण्यांसाठी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत ठाण मांडल्यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. कामकाज बारा वाजता सुरू झाल्यावरही सभागृहातील गोंधळाची स्थिती कायम राहिल्यामुळे अखेर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Story img Loader