सौरभ कुलश्रेष्ठ, सोलापूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तू कोण? मी कोण? हा कोण? हा विचार मनातून काढून टाका आपण सगळे एक आहोत हा बसवेश्व्रांचा विचार लक्षात ठेवा..भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्व्र स्वामी सांगत होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तिरंगी सामन्यानिमित्त थेट स्वामींची जात—समाजावरून सुरू झालेले राजकारण आणि भाजपमधील गटातटाच्या राजकारणचे चित्रच जणू स्वामीजींच्या तोंडून व्यक्त होत होते. हे सारे पाहत असलेल्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मग  मिनी पाकिस्तानची भाषा करणारे स्थानिक विरोधक आणि देशाची सुरक्षा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाचे अस्त्र काढले अन् राष्ट्रवादाच्या या संदेशाभोवतीच प्रचार फिरवायचा आहे हा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला.

सोलापूर लोकसभा क्षेत्रातील सहापैकी एक विधानसभा मतदारसंघ असलेल्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विजय संकल्प मेळावा हा एरवी अत्यंत स्थानिक पातळीवरचा पक्षांतर्गत कार्यक्रम. पण त्यासाठी थेट केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर हे प्रमुख पाहुणे. नरेंद्र मोदी यांचे मतदारसंघावर थेट लक्ष आहे हा संदेशच त्यातून दिला गेला. व्यासपीठावर या विधानसभेतील आमदार व राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपचे ज्येष्ठ नेते यांच्यासह मित्रपक्ष शिवसेनेचे शहरातील नेते महेश कोठे आदी मंडळीही मुद्दाम हजर.

सोलापुरात कॉंग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे जयसिद्धेश्व्र स्वामी यांच्यात तिरंगी लढत होत आहे. स्वामी यांच्यामुळे लिंगायत मतांचे भाजपकडे ध्रुवीकरण होऊ नये म्हणून विरोधकांनी थेट स्वामींची जात व इतर लिंगायत समाज असे राजकारण सुरू केले आहे. शिवाय भाजप सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या रासपच्या धनगर मतांवरही वंचित बहुजन आघाडीचा डोळा असून त्यांना भाजपपासून तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जातीपातीच्या या राजकारणाचा फटका बसू नये यासाठी स्वामी आपण सगळे एकची हाक देतात.

विकासाचे पर्व सुरू राहावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावेत यासाठी मला निवडून द्या,असे आवाहन करतात.

जातीपातीच्या राजकारणावर देशाची सुरक्षा हा राष्ट्रवादाचा रामबाण उपायच कामी येऊ  शकतो याचे समीकरण जुळवत तोच मुद्दा केंद्रस्थानी ठेवत प्रकाश जावडेकरांनी भाषणाचा रोख ठेवला. नुकतीच वंचित बहुजन आघाडीच्या सभेत एका झोपडपट्टीसाठी मिनी पाकिस्तान असा उल्लेख झाला. त्यावर उपस्थितांनी प्रतिसादही दिला होता. या घटनेकडे लक्ष वेधत जावडेकर यांनी ते मिनी पाकिस्तानची भाषा करतात तर आपण भारतमाता की जय म्हणतो हे लक्षात ठेवा असा सूचक इशारा देताच कार्यकत्यांचा प्रतिसाद मिळाला.