नवी दिल्ली: भाजप आता भ्रष्ट जनता पक्ष असून ज्या नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळयांना पक्षात घेतले आहे. त्यांना वॉशिंग मशीनमधून धुऊन स्वच्छ केले आहे. भ्रष्टांनी खच्चून भरलेला हा पक्ष केंद्रात सत्ता कसा चालवू शकतो, असा हल्लाबोल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘इंडिया’चा रामलीला मैदानावरील सभेत केला.

‘इंडिया’च्या सभेला भाजपने ठगांची सभा अशी टीका केली, त्याचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले की, या देशातील तमाम जनता भाजपला ठग वाटते का? निवडणूक रोख्यांचे सत्य उघड झाले आहे. त्यामुळे भाजपच ठगांचा पक्ष बनलेला असून त्यांच्याविरोधात जनता लढेल!

हेही वाचा >>> कंबोडियात पाच हजार भारतीयांवर सायबर अत्याचार, ५०० कोटींची फसवणूक, सरकारकडून रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात!

फडणवीसांनी मणिपूरला जावे!

सभेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. देशभर असंतोष असून देवेंद्र फडणवीसांनी पाहून यावे. मी त्यांच्या जाण्या-येण्याचा, जेवणाचा खर्च करतो. त्यांनी मणिपूरला जावे, अरुणाचल प्रदेश, दार्जिलिंग जावे. जम्मू-काश्मीरला जाऊन निर्वासित काश्मिरी पंडितांची भेट घ्यावी, लडाखला जावे, तिथली परिस्थिती पाहावी. त्यांनी एखादा बॉलीवूडचा निर्माता शोधून ‘मणिपूर फाइल्स’ चित्रपट काढावा, अशी  टीका ठाकरे यांनी केली.

Story img Loader