Premium

Lok Sabha Election Result 2024 : भारताच्या इतिहासातला हा ऐतिहासिक विजय, नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून एकूण जागांवर आघाडीवर मिळवली, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. या दणणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

narendra modi
भारताच्या इतिहासातला हा ऐतिहासिक विजय, नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रियाप्रतिक्रिया (PC : Narendra Modi/X)

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. एनडीएला संपूर्ण बहूमत मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसर्‍यांदा भारताचे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून एकूण जागांवर आघाडीवर मिळवली, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. या दणणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Lok Sabha Election Result 2024)

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

देशाच्या नागरिकांनी एनडीएवर सतत तिसऱ्यांदा विश्वास दाखवला.भारताच्या इतिहासातला हा ऐतिहासिक विजयाचा क्षण आहे. मी या स्नेह आणि आशीर्वादासाठी आपल्या कुटुंबासमोर नतमस्तर होतो. मी देशातील नागरिकांना शब्द देतो की त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही नेहमी नवी ऊर्जा, नवीन संकल्पाना घेऊन पुढे येऊ.”

Belapur vidhan sabha election
गावी जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे मोठे आव्हान; ऐरोली, बेलापूरमध्ये उमेदवारांची कसरत
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
Radhakrishna Vikhe Patil Said This Thing About Rahul Gandhi
Radhakrishna Vikhe Patil : “राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जायचा प्रस्ताव..” राधाकृष्ण विखे पाटील यांचा गौप्यस्फोट
Latur Politics
Latur Politics : अमित देशमुखांना भाजपाच्या अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान; देशमुख वर्चस्व राखणार की चाकूरकर जायंट किलर ठरणार?
Maharashtra Assembly Election 2024,
लातूरमध्ये काँग्रेसकडे वळलेल्या लिंगायत मतपेढीला भाजपची साद
Jharkhand Assembly Election 2024 Phase 1 Voting Updates in Marathi
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ५९ टक्के मतदान

पाहा पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघातून मोठा विजय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उमेदवार अजय राय आणि नरेंद्र मोदी यांच्यात शेवटपर्यंत अटीतटीची लढाई दिसून आली पण अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६ लाख १२ हजार ९७० मते मिळत दणदणीत विजय मिळवला. .

भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला होता. याआधी भाजपाने २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवलं होतं. यावेळी भाजपाने स्वतः ३७० जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. आता आपण जाणून घेऊ भाजपाने २०१४ मध्ये किती जागा लढवल्या आणि २०१९ मध्ये किती जागा लढवल्या? २०१४ मध्ये भाजपाने ४२८ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी २८२ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. तर २०१९ ला भाजपाने ४३६ जागांवर निवडणूक लढवली आणि ३०३ जागा मिळवल्या होत्या. भाजपाने २०१४ आणि २०१९ या दोन्ही वर्षांमध्ये बहुमताच्या संख्येपक्षा जास्त जागा मिळवल्या. आता या खेपेला म्हणजेच २०२४ मध्ये भाजपाने ४४१ जागा लढवल्या तर १०२ जागा मित्र पक्षांना दिल्या.

देशभरात किती टप्प्यात मतदान झालं? प्रत्येक टप्प्यात किती मतदारसंघ होते?

१८व्या लोकसभेसाठी देशभरात यंदा सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये तामिळनाडू, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंड, गुजरात अशा एकूण २१ राज्यांमध्ये एकाच टप्प्यात सर्व मतदान पार पडलं. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या मतदारसंघनिहाय मोठ्या राज्यांमध्ये सर्व सात टप्प्यांमध्ये मतदान झालं. महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून या सात दिवशी हे मतदान झालं.

पहिला टप्पा – २१ राज्ये, १०२ मतदारसंघ

दुसरा टप्पा – १३ राज्ये, ८८ मतदारसंघ

तिसरा टप्पा – १२ राज्ये, ९४ मतदारसंघ

चौथा टप्पा – १० राज्य, ९६ मतदारसंघ

पाचवा टप्पा – ८ राज्य, ४९ मतदारसंघ

सहावा टप्पा – ७ राज्य, ५८ मतदारसंघ

सातवा टप्पा – ८ राज्य, ५७ मतदारसंघ

दरम्यान, देशभरात यंदा ९६.६ कोटी मतदार मतदानासाठी पात्र असताना त्यातील फक्त ६४ कोटी मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. हे प्रमाण ६२.३६ टक्के इतकं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lok sabha election result 2024 pm narendra modi first reaction on lok sabha election result as nda leading over india ndj

First published on: 04-06-2024 at 20:06 IST

संबंधित बातम्या