Lok Sabha Election Result 2024 : देशाच्या राजकारणासाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकसभा निवडणूकीचा निकाल समोर येत आहे. लोकसभा निवडणूकीत एनडीए आणि इंडियामध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे. यंदा काँग्रेसनी अनेक जागांवर बाजी मारल्याने भाजपला बहुमताचा आकडा मिळाला नाही. निवडणुकीच्या निकालावर देशभरातून अनेक मोठ्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Lok Sabha Election Result 2024 )

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहेत. त्या म्हणाल्या, “आम्हाला आनंद आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहुमताचा आकडा मिळाला नाही. पंतप्रधान मोदींनी विश्वासार्हता गमावली आहे. त्यामुळे त्यांनी लगेच राजीनामा द्यायला पाहिजे कारण यावेळी ४०० जागांचा आकडा पार करणार असल्याचे सांगितले होते.एवढा पैसा खर्च करूनही मोदीजी आणि अमित शहा यांचा हा अहंकारामुळे इंडिया गट जिंकला आणि मोदी हरले. ते अयोध्यातही हरले. “

Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर
Sharad Pawar On Mahavikas Aghadi
Sharad Pawar : विधानसभेतील पराभवानंतर आता ‘मविआ’चं भविष्य काय? शरद पवारांनी सांगितली पुढची रणनीती
Aditya Thackeray Nana Patole Said This Thing
Mahavikas Aghadi : विधानसभेत महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, आदित्य ठाकरे, नाना पटोले काय म्हणाले?
Amol Khatal
Amol Khatal : बाळासाहेब थोरातांना पराभूत करणारा आमदार खास टोपी घालून विधान भवनात; म्हणाले, “ही टोपी…”
devendra fadnavis vidhan sabha election bjp
BJP Victory in Vidhan Sabha: महाराष्ट्रातील निकालांमुळे भाजपासाठी काय बदललं? स्पष्ट बहुमत, युतीवर वर्चस्व की आणखी काही?

हेही वाचा : Vidharbh Lok Sabha Election Result 2024: विदर्भात भाजपाचा सूपडा साफ, अवघ्या दोन जागांवर यश

पाहा व्हिडीओ

भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला आहे. याआधी भाजपाने २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवलं होतं. यावेळी भाजपाने स्वतः ३७० जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. आता आपण जाणून घेऊ भाजपाने २०१४ मध्ये किती जागा लढवल्या आणि २०१९ मध्ये किती जागा लढवल्या? २०१४ मध्ये भाजपाने ४२८ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी २८२ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. तर २०१९ ला भाजपाने ४३६ जागांवर निवडणूक लढवली आणि ३०३ जागा मिळवल्या होत्या. भाजपाने २०१४ आणि २०१९ या दोन्ही वर्षांमध्ये बहुमताच्या संख्येपक्षा जास्त जागा मिळवल्या.

हेही वाचा : ब्रिजभूषण सिंह यांचे चिरंजीव करण भूषण सिंहांचा कैसरगंजमधून दीड लाखांच्या मताधिक्याने विजय

दुसरीकडे एनडीएनं मात्र देशभरात सर्व राज्यांमध्ये एनडीए म्हणूनच निवडणूक लढवली. यात एकट्या भाजपानं देशभरात ४४१ जागा लढवल्या असून आणखी ९९ जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील इतर मित्रपक्षांनी लढवल्या. दुसरीकडे इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसनं ३१८ जागा लढवल्या. त्यापाठोपाठ समाजवादी पक्षानं सर्वाधिक ७५ ठिकाणी उमेदवार उभे केले होते.

महाराष्ट्रात २०२४ च्या निवडणुकीत भाजपाने मागच्यावेळेपेक्षा अधिक जागा स्वतःकडे घेतल्या आहेत. यावेळी शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) असे दोन घटक पक्ष असतानाही २८ जागा मिळविण्यात यश मिळविले आहे. यावेळी भाजपाने अमरावती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर आणि सातारा हे शिवसेनेचे चार मतदारसंघ स्वतःकडे वळविण्यात यश मिळविले आहे. तर भाजपाच्या कोट्यातला बारामती मतदारसंघ अजित पवार गटाकडे गेला आहे.

२०२४ च्या निवडणुकीला सामोरे जात असताना महायुतीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यांवर संघर्ष पाहायला मिळाला. मुंबईतील तीनही मतदारसंघातील उमेदवार भाजपाने बदलले ईशान्य मुंबईतून मनोज कोटक, उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन आणि उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट केला. तर बीडमधून प्रीतम मुंडे, सोलापूरमधून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी, जळगावमधून उन्मेष पाटील यांचाही पत्ता कट करण्यात आला. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यामुळे त्याठिकाणी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली होती

Story img Loader