Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणूकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसर्यांदा भारताचे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. एनडीएला संपूर्ण बहूमत मिळाले आहे पण भाजपाला स्वबळावर संपूर्ण बहूमत मिळवता आले नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपा यावेळी ४०० जागांचा आकडा पार करणार असल्याचे सांगितले होते. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपला काही जागांवर यश मिळवता आले नाही. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले नाही. काही चांगल्या जागेवरून भाजपाला अपयश स्वीकारावे लागले. यावरून सोशल मीडियावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Peoples Reaction on Lok Sabha Election Result )
@Polytikles नावाच्या एका एक्स युजरने लिहिलेय, “निकाल काहीही लागला असेल पण संसदेत द्वेष कमी दिसून येईल.”
भारतीय जनता पक्षाला सहकार्य करणाऱ्यांची सध्याची स्थिती कशी आहे, यावरून @fenilkothari नावाच्या युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपला यश मिळवता आले नाही. यावर एका युजरने लिहिलेय, “मला माफ करा, उत्तर प्रदेश. मला तुमच्या निन्जा चालीविषयी माहीत नव्हते.”
अयोध्या सारख्या अपेक्षित मतदारसंघातून भाजपाला पराभव स्वीकारावा लागला. भाजपाने अयोध्येत राम मंदिर उभारले. लोकसभा निवडणूकीदरम्यान राम मंदिराचा मुद्दा चांगला गाजला त्यामुळे अयोध्याच्या नागरिकांकडून भाजपाला मते मिळणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. यावर अनेक युजर्सनी पब्लिक स्मार्ट आहे, असे म्हणत भाजपाच्या पराभवावर मिश्किल प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा : Aurangabad Lok Sabha Result 2024: “निकाल पाहतोय तर दिसतंय माझं एकतर्फी प्रेम सुरू होत…
भाजपाने निवडणूकीत ४०० जागा जिंकण्याचा दावा केला होता पण त्यांना अपयश आले . यावर एका युजरने ४०० कुठे आहेत, असा प्रश्न विचारला आहे.
आज शेअर मार्केटमध्ये चांगलीच घसरण पाहायला मिळाली. यावर एका युजरने हम आपके है कोण चित्रपटातील एका सीनचे फोटो शेअर केले आहे. सेन्सेक्स कसा घसरला, हे मजेशीर पद्धतीने सांगितले आहे.
हेही वाचा : आंध्र प्रदेशात टीडीपी अन् भाजपाला बहुमत, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी दिला राजीनामा…
१८व्या लोकसभेसाठी देशभरात यंदा सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये तामिळनाडू, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंड, गुजरात अशा एकूण २१ राज्यांमध्ये एकाच टप्प्यात सर्व मतदान पार पडलं. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या मतदारसंघनिहाय मोठ्या राज्यांमध्ये सर्व सात टप्प्यांमध्ये मतदान झालं. महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून या सात दिवशी हे मतदान झालं.
पहिला टप्पा – २१ राज्ये, १०२ मतदारसंघ
दुसरा टप्पा – १३ राज्ये, ८८ मतदारसंघ
तिसरा टप्पा – १२ राज्ये, ९४ मतदारसंघ
चौथा टप्पा – १० राज्य, ९६ मतदारसंघ
पाचवा टप्पा – ८ राज्य, ४९ मतदारसंघ
सहावा टप्पा – ७ राज्य, ५८ मतदारसंघ
सातवा टप्पा – ८ राज्य, ५७ मतदारसंघ
दरम्यान, देशभरात यंदा ९६.६ कोटी मतदार मतदानासाठी पात्र असताना त्यातील फक्त ६४ कोटी मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. हे प्रमाण ६२.३६ टक्के इतकं होतं.