Lok Sabha Election Results 2024 : देशात नुकतीच १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली आणि आज या निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे. सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागलं आहे. एनडीए आणि इंडियामध्ये चुरशीची लढत बघायला मिळाली आहे. निवडणूकीत यश मिळावे, यासाठी भाजप आणि काँग्रेस नेते देवासमोर नतमस्तक होताना दिसत आहे आणि निवडणूकीत यश मिळावे, यासाठी देवाला साकडे घालताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर या नेत्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहे.

भाजपचे उमेदवार प्रवीण खंडेलवाल हे दिल्लीतील गौरी शंकर मंदिरात प्रार्थना करताना दिसले.

udit narayan lip kiss with fan in live show video viral
Video: ‘टिप टिप बरसा पानी’ गाताना उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना केलं किस, Lip Kiss चा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Congress leader Ravindra Dhangekar
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेच्या वाटेवर ?
Kriti Sanon joins tere ishq mein
Video : दंगल, जाळपोळ अन् मनात प्रेमाचं वादळ; ‘तेरे इश्क में’ चित्रपटातील क्रिती सेनॉनचा पहिला व्हिडीओ आला समोर
Protest by a pro-Khalistan mob outside the Indian High Commission in London met counter-protest
Video : लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांना भारतीयांनी दिलं सडेतोड उत्तर; भारतीय दूतावासाबाहेर निदर्शनं सुरू होताच…
gilr dance
“ऐका दाजीबा….!”, मराठमोळ्या गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून तुम्हीही व्हाल तिचे चाहते
Mumbai Cop’s Soulful Flute Cover On Ae Watan
‘ऐ वतन – वतन मेरे आबाद रहे तू’…. मुंबई पोलिसाने सादर केले बासरी वादन; Viral Videoने जिंकले भारतीयांचे मन
Delhi Assembly Elections BJP Third Manifesto
भाजपचा तिसरा जाहीरनामा; तीन वर्षांत यमुना स्वच्छ करण्याचे आश्वासन

नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार, बन्सुरी स्वराज (Bansuri Swaraj) यांनी दिल्लीतील श्री लक्ष्मी नारायण मंदिराला भेट दिली आणि निवडणूकीत विजय मिळावा, म्हणून प्रार्थना केली.

बिहार येथील पाटणा येथे भाजप कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी हवन आणि पूजा करताना दिसले.

भाजपचे खासदार व गोरखपूर मतदारसंघाचे उमेदवार रवी किशन यांनी गोरखपूरमधील पंचमुखी हनुमान मंदिरात प्रार्थना करताना दिसले.

पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार, हर्ष मल्होत्रा ​​लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीपूर्वी त्यांच्या निवासस्थानी प्रार्थना करताना दिसले.

हेही वाचा : उमेदवारांची भूमिका – उत्तर मुंबई; ‘ पॅराशूट ’ उमेदवार जनतेचे प्रश्न सोडविणार नाही – भूषण पाटील, काँग्रेस

तामिळनाडूच्या शिवगंगा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कार्ती चिदंबरम यांनी शिवगंगा जिल्ह्यातील कराईकुडी येथे काली अम्मा मंदिरात पुजा केली.

मध्य प्रदेशातील खजुराहो लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व्हीडी शर्मा यांनी मतमोजणीपूर्वी पन्ना येथील जुगल किशोर मंदिराला भेट दिली आणि निवडणूकीत विजय मिळावा, यासाठी प्रार्थना केली.

छत्तीसगडच्या दुर्ग मतदारसंघातील भाजप उमेदवार आज हनुमान मंदिरात प्रार्थना करताना दिसले.

हेही वाचा : उत्तर मुंबईला ‘उत्तम मुंबई’ करू; गोयल यांचा निर्धार ; राहुल गांधींनी लढण्याचे आव्हान

काँग्रेसचे खासदार आणि तिरुवनंतपुरम मतदार संघाचे उमेदवार शशी थरूर यांनी मतमोजणीपूर्वी तिरुवनंतपुरममधील पझवांगडी श्री महागणपती मंदिरात प्रार्थना केली

मध्य प्रदेश येथील छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नकुल नाथ यांनी मतमोजणी सुरू असताना छिंदवाडा येथील हनुमान मंदिराला भेट निवडणूकीत विजय मिळावा, यासाठी प्रार्थना केली.

देशभरात किती टप्प्यात मतदान झालं?

१८व्या लोकसभेसाठी देशभरात यंदा सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये तामिळनाडू, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंड, गुजरात अशा एकूण २१ राज्यांमध्ये एकाच टप्प्यात सर्व मतदान पार पडलं. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या मतदारसंघनिहाय मोठ्या राज्यांमध्ये सर्व सात टप्प्यांमध्ये मतदान झालं. महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून या सात दिवशी हे मतदान झालं.

प्रत्येक टप्प्यात किती मतदारसंघ होते?

पहिला टप्पा – २१ राज्ये, १०२ मतदारसंघ

दुसरा टप्पा – १३ राज्ये, ८८ मतदारसंघ

तिसरा टप्पा – १२ राज्ये, ९४ मतदारसंघ

चौथा टप्पा – १० राज्य, ९६ मतदारसंघ

पाचवा टप्पा – ८ राज्य, ४९ मतदारसंघ

सहावा टप्पा – ७ राज्य, ५८ मतदारसंघ

सातवा टप्पा – ८ राज्य, ५७ मतदारसंघ

दरम्यान, देशभरात यंदा ९६.६ कोटी मतदार मतदानासाठी पात्र असताना त्यातील फक्त ६४ कोटी मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. हे प्रमाण ६२.३६ टक्के इतकं होतं.

यंदा कोण मारणार बाजी?

भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला आहे. याआधी भाजपाने २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवलं होतं. यावेळी भाजपाने स्वतः ३७० जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. आता आपण जाणून घेऊ भाजपाने २०१४ मध्ये किती जागा लढवल्या आणि २०१९ मध्ये किती जागा लढवल्या? २०१४ मध्ये भाजपाने ४२८ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी २८२ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. तर २०१९ ला भाजपाने ४३६ जागांवर निवडणूक लढवली आणि ३०३ जागा मिळवल्या होत्या. भाजपाने २०१४ आणि २०१९ या दोन्ही वर्षांमध्ये बहुमताच्या संख्येपक्षा जास्त जागा मिळवल्या. आता या खेपेला म्हणजेच २०२४ मध्ये भाजपाने ४४१ जागा लढवल्या आहेत. तर १०२ जागा मित्र पक्षांना दिल्या आहेत. आता या यावेळी ४४१ पैकी ३७० जागा भाजपा जिंकतंय का हे आज स्पष्ट होणार आहे. २०१९ मध्ये भाजपाला जी मतं मिळाली त्याची सरासरी २०१४ च्या तुलनेत अधिक होती. २०१९ मध्ये भाजपाच्या विजयाचा स्ट्राईक रेट हा ६९ टक्क्यांवर पोहचला होता. आता या वेळी काय निकाल लागतो? एकट्या भाजपाला किती जागा मिळतात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

Story img Loader