लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची निवडणूक आयोग बुधवारी घोषणा करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी सकाळी साडे दहा वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. याच पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपथ निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करतील. निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केल्यावर लगेचच देशभरात आचारसंहिता लागू होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सात टप्प्यांमध्ये यंदाची लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून मे महिन्यातील दुसऱया आठवड्यापर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम असेल. सध्याच्या लोकसभेची मुदत एक जून रोजी संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणूक कार्यक्रम संपवून नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांची यादी राष्ट्रपतींकडे देणे निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. त्या दृष्टीने आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित केला आहे.

Story img Loader