निवडणूक आयोग लवकरच देशातल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो. यासह देशभरातील विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. वेगवेगळे पक्ष त्यांच्या लोकसभा उमेदवारांच्या याद्या जाहीर करू लागले आहेत. अशातच काँग्रेसने त्यांच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ४३ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. भाजपाने गेल्या आठवड्यात त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत भाजपाने एकूण १९५ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसने शुक्रवारी (८ मार्च) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत एकूण ३९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

काँग्रेसने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांना छिंदवाडामधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या राहुल कस्वान यांना चुरू मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. यासह जोरहाटमधून गौरव गोगोई, सिलचरमधून सुरज्या खान, जालौरमधून अशोक गहलोत यांचे पुत्र वैभव गहलोत यांना उमेदवारी दिली आहे. या ४३ पैकी १३ उमेदवार ओबीसी आहेत. दुसऱ्या यादीनुसार काँग्रेसने अनुसूचित जातींमधील १०, अनुसूचित जमातींमधील ९, जनरल ९ आणि एक मुस्लीम उमेदवार दिला आहे.

दरम्यान, काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत एकूण ३९ नेत्यांचा समावेश आहे. पहिल्या यादीत राहुल गांधी, शशी थरूर, भूपेश बघेल यांची नावे आहेत. काँग्रेसने राहुल गांधी यांना पुन्हा एकदा वायनाडमधून (केरळ) उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना त्यांच्या तिरुअनंतपुरम या मतदारसंघातूनच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून तिकीट दिलं आहे.

हे ही वाचा >> “भाजपा नेत्याने आदिवासी युवकाच्या तोंडावर लघूशंका केली, ही संतापजनक घटना…”, नंदुरबारमधून राहुल गांधींचा हल्लाबोल

डी के शिवकुमार यांच्या बंधूंना उमेदवारी

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यांना काँग्रेसने छत्तीसगडच्या राजनंदगाव या मतदारसंघातून तिकीट दिले आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांचादेखील समावेश आहे. ते केरळमधील अलापुझ्झा या जागेवरून निवडणूक लढवतील. २००९ साली वेणूगोपाल यांनी याच जागेवर विजयी कामगिरी करून दाखवली होती. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचे बंधू डी के सुरेश यांनादेखील काँग्रेसने पहिल्याच यादीत तिकीट दिले आहे. ते बंगळुरू ग्रामीण या मतदारसंघातून निवडणूक लढवतील.

Story img Loader