उना (हिमाचल प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लोकविरोधी’ ठरवत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वढेरा यांनी मोदी सत्तेत राहण्यासाठी धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका केली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाला गरजेच्या वेळी आपले दागिने दिले होते आणि मोदी म्हणतात की काँग्रेसवाले तुमचे मंगळसूत्र चोरतील. अशी भाषा देशाच्या पंतप्रधानांना शोभत नसल्याचे प्रियंका म्हणाल्या.

हेही वाचा >>> तृणमूलने ‘मत जिहाद’साठी ओबीसींचे हक्क हिसकावले : मोदी

हिमाचलच्या उना जिल्ह्यातील गाग्रेट येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना त्या म्हणाले की, मोदींनी स्वत:ला देव समजण्यास सुरुवात केली आहे आणि त्यांना वाटते की त्यांना धर्माच्या नावावर मते मिळतील, परंतु लोकांची दिशाभूल होणार नाही. हमीरपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सतपाल रायजादा आणि गाग्रेट विधानसभा पोटनिवडणुकीत पक्षाचे उमेदवार राकेश कालिया यांच्यासाठी प्रचार करताना प्रियंका म्हणाल्या की, भाजप ‘सर्वसाधारणपणे लोकविरोधी आणि विशेषत: युवकविरोधी आहे’. मोदी सरकारने अमेरिकन सफरचंदावरील आयात शुल्क कमी केल्याचेही त्या म्हणाले. मोदी सरकारवर हल्ला चढवत प्रियंका गांधी म्हणाल्या की भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडे हिमाचल प्रदेशातील आपत्तीग्रस्त लोकांसाठी पैसे नाहीत, परंतु त्यांनी श्रीमंत उद्याोगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले,’ असे त्यांनी जनतेला सांगितले.

Story img Loader