नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घराणेशाहीवरून केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला मंगळवारी लक्ष्य केले. केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांना घराणेशाहीची पार्श्वभूमी असल्याचे सांगत त्यांनी हे मंत्रिमंडळ म्हणजे ‘परिवार मंडळ’ आहे असा टोला लगावला.

रविवारी रालोआ सरकारच्या शपथविधीनंतर सोमवारी खातेवाटप जाहीर झाले. त्याच्या दुसऱ्या दिवशी गांधी यांनी समाजमाध्यमांतून अनेक मंत्र्यांचे वडील, आजोबांची नावे देत त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीवर बोट ठेवले. अनेक पिढ्यांचा संघर्ष तसेच त्याग, बलिदानाला घराणेशाही म्हणणारे प्रत्यक्षात सत्ता कुटुंबामध्येच वाटत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>> “संघाकडे मदत न मागितल्याने भाजपाची खराब कामगिरी”; RSS चा भाजपाला घरचा आहेर

● एच.डी. कुमारस्वामी : माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडांचे पुत्र

● ज्योतिरादित्य शिंदे : माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांचे पुत्र

● किरेन रिजीजू : अरुणाचलचे नेते रिंचेन रिजीजू यांचे पुत्र

● जयंत चौधरी : माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचे नातू

● रक्षा खडसे : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा

● चिराग पासवान : माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र

● जे.पी. नड्डा : मध्य प्रदेशात मंत्री जयश्री बॅनर्जी यांचे जावई

● पीयूष गोयल : माजी केंद्रीय मंत्री वेदप्रकाश गोयल यांचे पुत्र

● धर्मेंद्र प्रधान : माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रधान यांचे पुत्र

● जितीन प्रसाद : माजी खासदार जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र

● शांतनु ठाकूर : पश्चिम बंगालमधील माजी मंत्री मंजुल ठाकूर यांचे पुत्र

● रामनाथ ठाकूर : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांचे पुत्र

● राम मोहन नायडू : माजी केंद्रीय मंत्री येरेन नायडू यांचे पुत्र

● राव इंद्रजित सिंह : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री वीरेंद्र सिंह यांचे पुत्र

● कीर्ती वर्धन सिंह : उत्तर प्रदेशचे नेते महाराज आनंद सिंह यांचे पुत्र

● रवनीत सिंग बिट्टू : पंजाबचे दिवंगत मुख्यमंत्री बेयंत सिंग यांचे नातू

● अनुप्रिया पटेल : अपना दल संस्थापक सोनेलाल पटेल यांच्या कन्या

● अन्नपूर्णा देवी : माजी आमदार रमेश प्रसाद यादव यांच्या पत्नी

प्रत्यक्ष बोलणे आणि कृती यामध्ये जो फरक आहे त्यालाच नरेंद्र मोदी म्हणतात.– राहुल गांधी, काँग्रेस खासदार

Story img Loader