रामविलास पासवान यांनी शेवटी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कळपात सामिल होण्याच्या निर्णयावर गुरूवारी संध्याकाळी शिक्कामोर्तब केले. पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कळपात ओढण्यात भाजपला यश आले आहे. ‘भाजप’चे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी रामविलास पासवान यांच्या ‘रालोआ’मध्ये सामिल झाल्याची घोषणा केली व पासवान यांनी देखील याला दुजोरा दिला आहे.  ‘लोजप’ला लोकसभेच्या सात जागा सोडण्यावर सहमत झाल्यानंतर पासवान यांनी ‘भाजप’सोबत जाण्याचा निर्णय घेतला.