पीटीआय, नवी दिल्ली

नव्या संसद भवनाच्या आवारातील राष्ट्रीय नेते, स्वातंत्र्यसैनिक यांचे पुतळे हटविण्यात आले नसून त्यांचे एकाच ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. हा निर्णय एकतर्फी घेतला नसून संबंधितांशी चर्चा करण्यात आली होती, असे मत मावळत्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रविवारी व्यक्त केले.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी

राष्ट्रीय नेत्यांचे पुतळे ज्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे, त्या ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन रविवारी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पत्रकारांना पुतळे एकत्र ठेवण्याचा निर्णय का घेतला याविषयी माहिती दिली. लोकसभा सचिवालयाने हा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय योग्य असल्याचे बिर्ला यांनी सांगितले. राष्ट्रीय नेते व स्वातंत्र्यसैनिकांचे हे पुतळे वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने अभ्यागतांना ते योग्यरीत्या पाहणे कठीण झाले होेते. मात्र एकाच ठिकाणी ते असल्याने त्यातून अभ्यागतांना प्रेरणा मिळेल, असे बिर्ला यांनी सांगितले.

हेही वाचा >>>रशियाच्या तुरुंगात ओलीसनाट्य; सुरक्षा दलांच्या कारवाईत संशयित दहशतवादी ठार

पुतळे स्थलांतराचा निर्णय लोकसभा सचिवालयाने घेतला असून त्याचा सरकारशी काहीही संबंध नाही. विविध ठिकाणी असलेले पुतळे किंवा प्रतिमा सर्वांना पाहता येत नाही किंवा त्यांची योग्य पद्धतीने देखभालही करता येत नाही. जर हे सर्व पुतळे एका ठिकाणी ठेवले तर संसदेला भेट देणाऱ्यांना ते एकाच ठिकाणी पाहता येतील, त्याविषयी जाणून घेता येईल, असा विचार मनात आल्यानंतर त्याबाबत संबंधितांशी चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, असे बिर्ला यांनी सांगितले. पुतळे एकाच ठिकाणी असल्याने राष्ट्रीय नेत्यांच्या जीवनाची आणि कर्तृत्वाची माहिती अधिक चांगल्या प्रकारे प्रसारित होण्यास मदत होईल, असे बिर्ला म्हणाले.

नव्या संसदेच्या ‘गज द्वारा’तून पंतप्रधान संसदभवनामध्ये प्रवेश करतात. त्यांचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी या द्वारासमोरील संपूर्ण जागेचे सुशोभीकरण केले जात आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, महाराणा प्रताप अशा अनेक महापुरुषांचे पुतळे गेल्या आठवड्यात स्थलांतरित करण्यात आले.

सरकारचा निर्णय एकतर्फी; काँग्रेसची टीका

संसदेच्या आवारातील पुतळे स्थलांतरित करण्याचा निर्णय सत्ताधारी सरकारने एकतर्फी घेतला असल्याचा दावा काँग्रेसने रविवारी केला. ज्या ठिकाणी संसदेची प्रत्यक्ष बैठक होते, त्या बाजूला महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे नसावेत हा एकमेव उद्देश त्यांचा होता. लोकसभेच्या संकेतस्थळानुसार चित्र व पुतळ्यांवरील संसदेच्या समितीची अखेरची बैठक १८ डिसेंबर २०१८ रोजी झाली. १७ व्या लोकसभेत त्याबाबत एकही बैठक झाली नसताना हा निर्णय कधी घेतला, असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी विचारला.