केंद्रात एनडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून अटीतटीचं राजकारण पाहण्यास मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्याच अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांमधील असहमतीचा परिणाम म्हणून लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून काही घडामोडी पाहायला मिळाल्या. नव्या लोकसभेचा अध्यक्ष निवडताना शक्यतो निवडणूक टाळली जाते. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या चर्चेमधून एकमताने निवड करण्यात येते. मात्र, यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये एकमत झाले नाही. त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली.

या निवडणुकीत एनडीएकडून ओम बिर्ला हे उमेदवार होते. तर इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे खासदार के.सुरेश हे उमेदवार होते. संसदेमध्ये २६ जून रोजी आवाजी मतदानाद्वारे ही निवडणूक पार पडली. यामध्ये ओम बिर्ला यांची पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बिर्ला लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान झाले. दरम्यान, याआधी लोकसभेच्या अध्यक्षपदी कोणाकोणाची निवड झालेली आहे? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

rahul gandhi
राहुल गांधींची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले, “विरोधी पक्षनेता हे फक्त पद नाही, मी तुमचा…”
lok sabha erupts as speaker om birla reads resolution on emergency
‘आणीबाणी’च्या निषेधाचा अचानक प्रस्ताव; केंद्र सरकारच्या खेळीने बेसावध काँग्रेसची कोंडी
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
PM narendra modi and joe biden
Lok Sabha Election Result 2024 Updates : इंडिया आघाडीचं ठरलं; सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत, पण योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचं सूचक विधान!

हेही वाचा : Om Birla Lok Sabha Speaker : १८ व्या लोकसभेचं अध्यक्षपद एनडीएकडेच, ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड! काँग्रेसला उपाध्यक्षपद मिळणार का?

लोकसभेचे अध्यक्ष हे लोकसभेचे पीठासीन अधिकारी असतात. सर्वसाधारणपणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या बैठकीत अध्यक्षाची निवड केली जाते. दरम्यान, आतापर्यंत लोकसभेचे अध्यक्षपदाचे कामकाज कोणी-कोणी पाहिले, यासंदर्भातील माहिती जाणून घेऊयात.

लोकसभेच्या आतापर्यंतच्या अध्यक्षांची यादी

लोकसभेचे पहिले अध्यक्ष गणेश वासुदेव मावळणकर होते. गणेश वासुदेव मावळणकर यांनी १५ मे १९५२ ते २७ फेब्रुवारी १९५६ या कालावधीत अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.

लोकसभेचे दुसरे अध्यक्ष एम.ए.अय्यंगार हे होते. त्यांनी ८ मार्च १९५६ ते १० मे १९५७ या कालावधीत आणि ११ मे १९५७ ते १६ एप्रिल १९६२ या कालावधीत अध्यक्ष म्हणून काम पाहिलं.

लोकसभेचे तिसरे अध्यक्ष म्हणून सरदार हुकम सिंग होते. त्यांनी १७ एप्रिल १९६२ ते १६ मार्च १९६७ या कालावधीत लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.

लोकसभेचे चौथे अध्यक्ष म्हणून नीलम संजीव रेड्डी होते. त्यांनी १७ मार्च १९६७ ते १९ जुलै १९७१ या कालावधीत ते लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.

लोकसभेचे पाचवे अध्यक्ष म्हणून गुरदयाल सिंग धिल्लन हे ८ ऑगस्ट १९६९ ते १९ मार्च १९७१ पर्यंत लोकसभेचे अध्यक्ष होते. तसेच २२ मार्च १९७१ ते १ डिसेंबर १९७५ या काळातही त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं.

लोकसभेचे सहावे अध्यक्ष बळीराम भगत होते. त्यांनी १५ जानेवारी १९७६ ते २५ मार्च १९७७ या कालावधीत लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.

लोकसभेचे सातवे अध्यक्ष म्हणून नीलम संजीव रेड्डी हे होते. त्यांनी २६ मार्च १९७७ ते १३ जुलै १९७७ या कालावधीत ते लोकसभेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

लोकसभेचे आठवे अध्यक्ष के.एस.हेगडे होते. त्यांनी २१ जुलै १९७७ ते २१ जानेवारी १९८० या कालावधीत लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं.

लोकसभेचे नववे अध्यक्ष म्हणून बलराम जाखड होते. त्यांनी २२ जानेवारी १९८० ते १५ जानेवारी १९८५ या दरम्यान कामकाज पाहिलं. पुन्हा १६ जानेवारी १९८५ ते १८ डिसेंबर १९८९ पर्यंत अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलं.

लोकसभेचे १० वे अध्यक्ष रबी राय होते. ते १९ डिसेंबर १९८९ ते ९ जुलै १९९१ या कालावधीत ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

लोकसभेचे ११ वे अध्यक्ष शिवराज पाटील हे होते. त्यांनी १० जुलै १९९१ ते २२ मे १९९६ या कालावधीत लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.

लोकसभेचे १२ वे अध्यक्ष पी.ए संगमा होते. त्यांनी हे २३ मे १९९६ ते २३ मार्च १९९८ या कालावधीत लोकसभेच्या अध्यक्ष म्हणून काम पाहिलं.

जी एम सी बालयोगी हे लोकसभेचे १२ वे अध्यक्ष होते. त्यांनी २४ मार्च १९९८ ते १९ ऑक्टोबर १९९९ या दरम्यान काम पाहिलं. त्यानंतर ते २२ ऑक्टोबर १९९९ ते ३ मार्च २००२ पर्यंत कार्यरत होते.

लोकसभेचे १३ वे अध्यक्ष मनोहर जोशी होते. त्यांनी १० मे २००२ ते २ जून २००४ या कालावधीत लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं.

लोकसभेचे १४ वे अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी हे होते. त्यांनी ४ जून २००४ ते ३० मे २००९ या कालावधीत लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं.

लोकसभेचे १५ वे अध्यक्षा मीरा कुमार या होत्या. त्यांनी ३० मे २००९ ते ४ जून २०१४ या कालावधीत त्या लोकसभेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या.

लोकसभेच्या १६ व्या अध्यक्षा सुमित्रा महाजन या होत्या. ६ जून २०१४ ते १६ जून २०१९ या कालावधीत सुमित्रा महाजन यांनी लोकसभेच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिलं.

लोकसभेचे १७ वे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांनी काम पाहिले. त्यानंतर पुन्हा एकदा १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाली.