लोकपाल विधेयक लवकरात लवकर राज्यसभेत मंजूर करून घेण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, विरोधी पक्षाचे सदस्य सभागृहाचे कामकाज चालू देत नसल्यामुळेच हे विधेयक अडले असल्याचे केंद्रीय मंत्री व्ही. नारायणसामी यांनी सांगितले.
लोकसभेमध्ये हे विधेयक मंजूर झाले आहे. त्यामुळे राज्यसभेमध्ये त्यावर प्राधान्याने चर्चा होऊन ते मंजूर करून घेण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे नारायणसामी म्हणाले. विरोधी पक्षांचे सदस्य दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीतपणे चालू देत नाहीत. ज्यावेळी सभागृहांचे कामकाज सुरळीत होईल, त्यावेळी राज्यसभेमध्ये प्राधान्याने हे विधेयक मंजूर करून घेण्यात येईल. हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी केंद्र सरकारने सर्व तयारी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जनलोकपाल विधेयक संसदेमध्ये तातडीने मंजूर करावे, यामागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे मंगळवारपासून राळेगणसिद्धीमध्ये बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

Story img Loader