लोकपाल विधेयक देशाच्या हिताचे नाही. यामुळे कोणताही अधिकारी निर्णय घेणार नाही आणि देशात अनिर्णयाची स्थिती निर्माण होईल, असे सांगत समाजवादी पक्षाने मंगळवारी राज्यसभेत लोकपाल विधेयकाच्या चर्चेतून सभात्याग केला. समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील नेते रामगोपाल यादव यांनी तीव्र शब्दांत या विधेयकाचा विरोध केला.
यादव म्हणाले, देशातील सगळे लोक अप्रामाणिक असून, केवळ लोकपालच प्रामाणिक असेल, या चुकीच्या धारणेवर हे विधेयक आधारलेले आहे. लोकपाल कायदा अस्तित्त्वात आल्यास कोणताही अधिकारी निर्णय घेणार नाही. प्रत्येक फाईल ही निर्णयासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवली जाईल. त्यामुळे देशात अनिर्णयाची आणि अराजकाची स्थिती निर्माण होईल.
सभागृहाने हे विधेयक मंजूर करण्याअगोदर फेरविचार करावा, असे सांगत समाजवादी पक्षाच्या सर्व सदस्यांनी सभात्याग केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in