देशातील ५४३ जागांसाठी ७ टप्प्यांत निवडणुका होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज (रविवार) जाहीर केले आहे. या निवडणुकीत यंदा ९० कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २०१४ पासून आतापर्यंत यामध्ये ८.४ कोटी मतदारांची भर पडली आहे. विशेष म्हणजे १८ ते १९ वयोगटातील १.५ कोटी मतदार आहेत. या नवमतदारांची भूमिका यंदा महत्वाची असणार आहे. गत निवडणुकीत युवा मतदार आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे या मतदारांकडे विशेष असे लक्ष असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभरातील ९९.३ टक्के मतदारांकडे मतदान ओळखपत्र आहे. १०९५ या क्रमांकावर एसएमएस करून लोकांना मतदान पत्रिकेतील आपले नाव शोधू शकतील. हा क्रमांक निशूल्क आहे. निवडणूक तारखांची घोषणा केल्यानंतर १० दिवसानंतर मत पत्रिकेत कोणताच बदल केला जाणार नाही. सर्वांत कमी मतदान हे लक्षद्वीप येथे आहे. तिथे ४९,९२२ मतदार आहेत. तर सर्वाधिक मल्काजगिरी येथे ३१,८३,३२५ मतदार आहेत.