अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज (रविवारी) जाहीर झाला. देशभरात एकूण ७ टप्प्यात निवडणुका होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी जाहीर केले. महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होणार असून पहिला टप्पा ११ एप्रिल रोजी होणार आहे. मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. तर अखेरचा टप्पा २९ एप्रिल रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून, सदस्यसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षासाठी महाराष्ट्र हे महत्वाचे राज्य आहे. यंदा राज्यात ८ कोटी ७३ लाख मतदार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी ७ दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे २०१४ च्या तुलनेत यंदा महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे.
११ एप्रिल पहिला टप्पा
वर्धा, रामटेक, नागपूर, गोंदिया- भंडारा, गडचिरोली – चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ – वाशिम
१८ एप्रिल दुसरा टप्पा
बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर
२३ एप्रिल तिसरा टप्पा
जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
२९ एप्रिल चौथा आणि अखेरचा टप्पा
नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी
असा असेल महाराष्ट्रात निवडणूक कार्यक्रम
– ११ एप्रिल – ७ जागांसाठी मतदान
– १८ एप्रिल – १० जागांसाठी मतदान
– २३ एप्रिल – १४ जागांसाठी मतदान
– २९ एप्रिल – १७ जागांसाठी मतदान