निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. आयोगाने लोकसभेच्या एकूण ५४३ जागांवर ७ टप्प्यात निवडणुकीची घोषणा केली आहे. ११, १८, २३, २९ एप्रिल आणि ६, १२ आणि १९ मे रोजी निवडणुका होणार आहेत. सर्व टप्प्यातील मतमोजणी ही २३ मे रोजी होईल. २२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांत एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी याची घोषणा केली. देशात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याचेही त्यांनी सांगितले. मागील वेळी देशात ९ टप्प्यात मतदान झाले होते. विद्यमान लोकसभेचा कार्यकाळ ३ जूनला संपणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या टप्प्यात २० राज्यांमधील ९१ जागांवर मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यातील ९७ जागांसाठी मतदान होईल. तिसऱ्या टप्प्यात १४ राज्यातील ११५ जागांसाठी मतदान होईल. चौथ्या टप्प्यात ९ राज्यातील ७ जागा, ५ व्या टप्प्यात ७ राज्यातील ५१ जागा, सहाव्या टप्प्यात ७ राज्यातील ५९ जागा आणि ७ व्या आणि अखेरच्या टप्प्यात ८ राज्यातील ५९ जागांसाठी मतदान होईल. दिल्लीत सहाव्या टप्प्यात म्हणजे १२ मे रोजी मतदान होईल. १२ राज्यातील ३४ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीही लोकसभेबरोबर मतदान होईल.

प्रत्येक मशीनमध्ये व्हीव्हीपॅटची सुविधा

यंदा सर्व मतदानकेंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनची सुविधा असेल. त्यामुळे मतदाराला त्याने केलेले मत कोणाला गेले आहे ते समजेल. त्याचबरोबर ईव्हीएमलाही अनेक स्तरीय सुरक्षा असेल. प्रत्येक उमेदवाराला फॉर्म २६ भरावे लागेल. देशभरात एकूण १० लाख मतदान केंद्रांवर मतदान होईल. २०१४ मध्ये ही संख्या ९ लाखांच्या आसपास होती. सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असतील. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे चित्रिकरण केले जाणार आहे.

पत्रकार परिषदेतील काही ठळक मुद्दे:

https://twitter.com/ANI/status/1104719122032545794

– ६ मे रोजी पाचव्या टप्प्यातले, १२ मे रोजी सहाव्या टप्प्यातले मतदान तर १९ मे रोजी अखेरच्या सातव्या टप्प्यातले मतदान

– महाराष्ट्र २३ एप्रिलला १४ जागांसाठी मतदान

– महाराष्ट्र- २९ एप्रिल १७ जागांसाठी मतदान

– १८ एप्रिलला महाराष्ट्रात १० जागांसाठी मतदान

– महाराष्ट्रात ११ एप्रिलला ७ जागांसाठी मतदान

– महाराष्ट्रात ४ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

– एकाच टप्प्यात २२ राज्यांमध्ये होणार मतदान

– दुसऱ्या टप्प्यातले मतदान १८ एप्रिलला होणार

– ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातलं मतदान होणार

– यंदा देशात ९० कोटी मतदार मतदान करणार

– १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या दीड कोटी

– पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी माध्यम निरीक्षण समिती स्थापन

– सोशल मीडियावरील जाहिरातांसाठी पे सर्टिफिकेशन सादर करावे लागणार

– सोशल मीडियावरील जाहिरातीचा खर्च निवडणुकीच्या खर्चात धरणार

– रात्री १० ते सकाळी ६ लाऊडस्पीकर वापरायला परवानगी नाही

– पर्यावरणाला हानीकारक वस्तू वापरण्यावर बंदी

– मतदान केंद्रांवर फोटो व्होटर स्लीप ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरणार नाही

– प्रवासादरम्यान मतदान यंत्रे जीपीएसच्या साहाय्याने ट्रॅक करणार

– मतदान कुणाला केलं याचा पुरावा मिळणार

– देशभरात आजपासून निवडणुकीचा आचारसंहिता लागू होणार

– सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मतदान यंत्रांचा वापर होणार

– निवडणुकीसाठी देशभरात १० लाख मतदान केंद्रे

– मतदारांची संख्या ९० कोटींनी वाढली