लोकसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. कोणत्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असून विरोधकांच्या इंडिया आघाडीत त्यासाठी जागावाटपावर चर्चा चालू आहे. पंजाब राज्यात मात्र आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेस यांच्यात अद्याप एकमत झालेले नाही. असे असताना याच जागावाटपावर आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पंजाबमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लडवण्यावर काँग्रेस आणि आमच्यात एकमत झाले आहे, असे केजरीवाल म्हणाले आहेत.

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

अरविंद केजरीवाल यांनी आज (१८ फेब्रुवारी) काँग्रेसचे महत्त्वाचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांच्या घरी जाऊन भोजन केले. त्यानंतर केजरीवाल यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. “काँग्रेस आणि आपने पंजाबमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे ठरवले असून यावर आमचे एकमत झाले आहे, आमच्यात कोणतेही वैर नाही,” असे केजरीवाल म्हणाले.

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जोरगेवारांनी थेट फडणवीसांसमोरच व्यक्त केली मुनगंटीवारांवरील नाराजी; म्हणाले, “उमेदवारी मिळू नये म्हणून…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
maharashtra assembly election 2024 rohit pawar campaign for maha vikas aghadi candidate ajit gavhane in bhosari assembly constituency
महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, महायुतीच्या सोबतच्या पक्षांची मदत लागणार नाही – रोहित पवार
thackeray shiv sena break in panvel
पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट
Mulik joins Tingre for campaign in Wadgaon Sheri seat
आमदारकीचा शब्द मिळताच कट्टर विरोधक झाला मित्र, कुठे घडला हा प्रकार !
Chandrapur marathi news
एकदाच मतदान करण्याचा अधिकार…पण, या गावात मात्र दोन वर्षांत चौथ्यांदा…
Assembly Election 2024, Doctor, Manifesto
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टरांचा जाहीरनामा! राजकारण्यांकडे केलेल्या मागण्या जाणून घ्या…
maharashtra vidhan sabha election 2024, chandrapur district, congress, bjp
लोकसभेतील मताधिक्य कायम राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान, भाजपला चिंता

“दिल्लीसाठी आमच्यात चर्चा चालू “

काँग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहेत. मात्र पंजाब राज्यात ते एकमेकांचे विरोधक आहेत. पंजाब राज्यात हे दोन्ही पक्ष स्वंतत्रपणे निवडणूक लढवणार असून दिल्लीसाठी आमच्यात जागावाटपावर चर्चा चालू आहे, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले. “दिल्लीमध्ये युती करण्यासाठी आमची काँग्रेसशी चर्चा चालू आहे. दिल्लीमध्ये आमच्यात युती न झाल्यास त्याचा भाजपाला फायदा होईल,” असे केजरीवाल म्हणाले. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दिल्लीतील सर्व सात जागांवर विजय मिळवला होता. २०१४ मध्येही त्यांनी सर्व जागा जिंकल्या होत्या.

“सर्व जागांवर उमेदवार उभे करणार आहोत”

याआधी पंजाबचे मुख्यमंत्री तथा आपचे नेते भगवंत मान यांनीदेखील आपने पंजबामधील सर्व १३ जागांवर उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे, असे सांगितले होते. या विधानानंतर काँग्रेसचे पंजाबमधील नेते प्रतापसिंग बाजवा यांनी भगवंत मान यांचे आभार मानत आम्हालादेखील हेच हवे आहे, असे सांगितले होते.

“आम्ही दोघे कसे एकत्र निवडणूक लढू शकतो?”

“पाकिस्तान आणि अन्य राज्यांत फरक आहे. पंजाबमध्ये आप सत्ताधारी पक्ष आहे. तर आम्ही तेथे प्रमुख विरोधी पक्ष आहोत. आम्ही पंजाबमध्ये एकत्र कसे निवडणूक लढवू शकतो. आम्ही दोघांनीही एकत्र निवडणूक लढवण्याचे ठरवल्याल सत्ताविरोधी भावना असलेले मतदार भाजपाला किंवा अकाली दलाला मतदान करतील. अशा पद्धतीने काँग्रेस पक्ष पंजाबमधून हद्दपार होईल. आम्हाला आमची व्होटबँक सांभाळायची आहे. स्वतंत्रपणे निवडणूक लढवणे हेच काँग्रेस आणि आपसाठी सोईचे ठरेल,” असे बाजवा म्हणाले होते.