सर्वसाधारण वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षणाचे विधेयक मंगळवारी (दि.८) रात्री उशीरा लोकसभेत मंजूर झाले. या आरक्षणासाठी राज्यघटनेत १२४ वी घटनादुरुस्ती करण्यात येणार आहे. या विधेयकातील सर्वंच संशोधनांना बहुमताने मंजुरी देण्यात आली आहे. या विधेयकाच्या समर्थनार्थ ३२३ मतं पडली तर ३ खासदारांनी याविरोधात मतदान केले. यासाठी एकूण ३२६ खासदारांनी मतदान केले होते. आता राज्यसभेत या विधेयकाची खरी कसोटी लागणार आहे. असे असले तरी हा निर्णय मोदी सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घेतल्याचे मत लोकसत्ता ऑनलाइनच्या वाचकांनी एका जनमत चाचणीमध्ये नोंदवले आहे. ७७ टक्के वाचकांनी मोदी सरकारचा सवर्णांना आरक्षण देण्याचा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घेतला असल्याचे म्हटले आहे.
लोकसत्ता ऑनलाइनने ट्विटर तसेच फेसबुकवर घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये एकूण १८०० हून अधिक वाचकांनी आपले मत नोंवदले. ‘गरीब सवर्णांना १० टक्के आरक्षणाचा निर्णय मोदी सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतला, असे वाटते का?’ हा प्रश्न वाचकांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना ट्विटवरील ७७ टक्के तर फेसबुकवरील ७५ टक्के वाचकांनी ‘होय’ असे उत्तर दिले आहे.
ट्विटवर एकूण १ हजार २२८ जणांनी या प्रश्नावर आपले मत व्यक्त केले. त्यापैकी ९४६ जणांनी म्हणजेच ७७ टक्के वाचकांनी ‘होय’ असे उत्तर दिले आहे तर २८२ जणांनी (२३ टक्के वाचकांनी ) ‘नाही’ असे उत्तर दिले आहे.
#LoksattaPoll:
गरीब सवर्णांना १० टक्के आरक्षणाचा #Reservation निर्णय मोदी सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतला, असे वाटते का?— LoksattaLive (@LoksattaLive) January 8, 2019
अनेकांनी या जनमत चाचणीवर रिप्लाय करुन आपले मत नोंदवले आहे. पाहुयात काय आहे वाचकांचे म्हणणे
100 टक्के राजकीय फायद्यासाठी
100% फक्त राजकीय फायद्यासाठी हा प्रयत्न केला आहे..
— Malhar (@MalharTakle) January 8, 2019
फक्त गाजर
हे फक्त गाजर आहे
— Mangesh (@Mangesh28834521) January 8, 2019
भीतीने घेतलेले निर्णय
केंद्रातील सत्ता जाण्याच्या भीतीने घेतलेला निर्णय …
— Sachin Narkar (@sachinnarkar5) January 8, 2019
चार वर्षे झोपले होते का?
#LoksattaPoll:
गरीब सवर्णांना १० टक्के आरक्षण #Reservation व शेतकऱ्यांना एकरी मदत देण्याचं गाजर मोदी सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दाखवले आहे,सरकार 4 वर्ष काय झोपलं होत का निर्णय करायला?सगळा फार्स आहे.— NITINBHAU ZINJADE (@ZinjadeNitin) January 9, 2019
हा तर जुमला
100% चुनावी #जुमला
— Sanket Solunke (@SanketSolunke) January 8, 2019
तर दुसरीकडे फेसबुकवर एकूण ६५४ वाचकांनी या प्रश्नावर आपले मत नोंदवले त्यापैकी ७५ टक्के म्हणजेच ४९० जणांनी ‘होय’ असे मत नोंदवले आहे. मात्र त्याच वेळी २५ टक्के म्हणजेच १६४ जणांनी नाही असे मत नोंदवत मोदी सरकारचा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घेण्यात आलेला निर्णय नसल्याचे म्हटले आहे.
याच दरम्यान आज (बुधवार) हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. राज्यसभेत मोदी सरकारकडे बहुमत नसल्याने हे विधेयक इथं मंजूर होण्यासाठी कसोटी लागणार आहे.