सर्वसाधारण वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षणाचे विधेयक मंगळवारी (दि.८) रात्री उशीरा लोकसभेत मंजूर झाले. या आरक्षणासाठी राज्यघटनेत १२४ वी घटनादुरुस्ती करण्यात येणार आहे. या विधेयकातील सर्वंच संशोधनांना बहुमताने मंजुरी देण्यात आली आहे. या विधेयकाच्या समर्थनार्थ ३२३ मतं पडली तर ३ खासदारांनी याविरोधात मतदान केले. यासाठी एकूण ३२६ खासदारांनी मतदान केले होते. आता राज्यसभेत या विधेयकाची खरी कसोटी लागणार आहे. असे असले तरी हा निर्णय मोदी सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घेतल्याचे मत लोकसत्ता ऑनलाइनच्या वाचकांनी एका जनमत चाचणीमध्ये नोंदवले आहे. ७७ टक्के वाचकांनी मोदी सरकारचा सवर्णांना आरक्षण देण्याचा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घेतला असल्याचे म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा