लंडनमध्ये दोन व्यक्तिंनी एका नागरिकाचा शिरच्छेद केल्याचे वृत्त असून मृत नागरिक ब्रिटिश सैनिक असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मात्र, याबद्दल जाहीररीत्या काही सांगण्याचे पोलिसांनी टाळले. नंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघेजण जखमी झाले.
लंडन शहराजवळील वूलविच स्ट्रीट येथे एका सैनिकास मारण्यात आल्याचे समजताच पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघेजण जखमी झाले. हे दोघेजण प्राणघातक शस्त्रे बाळगून होते. रॉयल बरॅक्स येथे काम करीत असलेल्या सैनिकावर या दोघांनी हल्ला केल्याचे स्थानिक खासदार निक रेन्सफोर्ड यांनी सांगितले. यासंदर्भात गृह मंत्रालयाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2013 रोजी प्रकाशित
लंडनमध्ये दहशतवादी हल्ल्यात सैनिक ठार ?
लंडनमध्ये दोन व्यक्तिंनी एका नागरिकाचा शिरच्छेद केल्याचे वृत्त असून मृत नागरिक ब्रिटिश सैनिक असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मात्र, याबद्दल जाहीररीत्या काही सांगण्याचे पोलिसांनी टाळले.
First published on: 23-05-2013 at 02:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: London man allegedly beheaded by two others terror attack suspected