महाराष्ट्रात आणि देशात सध्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा उत्साह आहे. अशात विरोधी पक्षांकडून रामावर आणि राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावर टीकाही केली जाते आहे. अशात आता बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी रामाच्या नावावर राजकारण होणं योग्य नाही असं म्हटलं आहे. ANI ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. राजकारण हे धर्माने केलं पाहिजे धर्माचं राजकारण करायला नको असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसांपूर्वी असं वक्तव्य केलं होतं की राम मांसाहारी होता. त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. त्यानंतर आता धीरेंद्र शास्त्री यांनी याविषयीचं वक्तव्य केलं आहे. रामाच्या नावावरुन राजकारण व्हायला नको. धीरेंद्र शास्त्री हे बागेश्वर धामचे महाराज आहेत. ते कायमच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.

काय म्हणाले आहेत धीरेंद्र शास्त्री?

राम हा राजकारणाचा विषय नाही. राजकारण धर्माने चालतं. धर्माचं राजकारण केलं जात नाही. भारतातल्या नागरिकांमध्ये जागृती झाली आहे. आता त्यांनी मत त्यांच्या बुद्धीला अनुसरुन दिलं पाहिजे. भारत विश्वगुरु झाला पाहिजे हा दृष्टीकोन असणारं सरकारच निवडलं पाहिजे. राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम. राम म्हणजे संपन्नता, अखंडता, एकता आहे असं बागेश्वर धाम सरकार यांनी म्हटलं आहे. रामाच्या नावावर राजकारण करुन आपली पोळी भाजून घेणं हा मूर्खपणा आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.

ज्ञानवापी मशिदीबाबत भाष्य

ज्ञानवापीत शंकर आहेत यात दुमत असण्याचं कारण नाही. तसंच मथुरा ही कृष्णाची आहे यातही काही शंका नाही. देशात न्यायालय आहे. ASI ला जे पुरावे मिळाले आहेत त्यावरुन हे सिद्ध होतं की तिथे सनातन धर्मच आहे. मोहम्मद घोरी, अकबर, बाबर यांनी आक्रमणं केली. मंदिरांवर जे हल्ले झाले, ज्या जखमा केल्या गेल्या ते घाव आता भरले जात आहेत. सध्याचा काळ हिंदू धर्मासाठी आणि हिंदूंसाठी सुवर्णकाळ आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lord ram is not a topic of politics said bagshwar dham dhirendra krishna shastri scj
Show comments