Los Angeles wildfire Video : अमेरिकेतली लॉस एंजेलिस शहरात लागलेल्या भयंकर आगीमध्ये हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या भीषण घटनेत अनेक जणांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. या वणव्यादरम्यान एक आलीशान घर आगीत जळतानाचा व्हिडीओ सोशव मीडियावर व्हायरल झाला आहे.
अमेरिकेतील ऑनलाइन रिअल इस्टेट मार्केटप्लेस Zillow वर हे घर ३५ मिलीयन डॉलर्स (अंदाजे २८८ कोटी रुपये) किमतीला विकत घेण्यासाठी उपलब्ध होते. पण लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेल्या वणव्यादरम्यान हे पूर्णपणे जळू खाक झाले आहे. या व्हिडीओमध्ये या विनाशकारी आगीची दाहकता पाहायाला मिळत आहे.
दुरून घेण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये कुंपनाच्या आत असलेले भलेमोठे घर जळताना दिसत आहे. ही इतकी भीषण आहे की आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडताना दिसत आहे.
लॉस एंजेलिस शहर हे अमेरिकेतली चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातील तसेच हॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचे घर आहे. या वणव्याचा शहरातील पॅसिफिक पॅलिसेड्स, पासाडेना, अल्ताडेना आणि हॉलीवूड हिल्स या भागांना मोठा फटका बसला आहे. या आगीच्या घटनेत किमान ५ लोकांचा मृत्यू झाला आहे तर १०००,००० इतक्या लोक विस्थापित झाले आहेत.
फक्ते रस्ते उरले..
या आगीच्या घटनेत सुमारे १,५०० इमारती आणि १०८ स्क्वेअर किलोमीटरचा भाग जळून खाक झाला आहे. या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या इमारतींमध्ये पॅसिफिक पॅलिसेड्स आमि हॉलीवूड हिल्स भागातील अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींच्या घरांचा समावेश आहे.
या भागात गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून जराही पाऊस पडला नाही, त्यामुळे येथील अत्यंत कोरड्या वातावरणामुळे या भागात आग वेगाने पसरल्याचे सांगितले जात आहे. यातच वेगाने वारा सुटल्याने आगीची तिव्रता कित्येक पटीने वाढली तसेच अग्निशमन विभागालाही अडचणींचा सामना करावा लागला.
कॅलिफोर्नियामध्ये शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी आगीचे तांडव सुरू आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अथक प्रयत्न करत आहेत. असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टनुसार या भागात फक्त रस्ते उरले आहेत. येथील सर्व घरे आगीमुळे नष्ट झाले आहे.