अफझल गुरु याला फासावर चढविण्यात आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शहराच्या पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी मंगळवारी तीन तासांसाठी शिथील करण्यात आली.
शहरातील राममुन्शी बाग, राजबाग, कोठीबाग, शेरगढी आणि सद्दर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी सायंकाळी चारपासून शिथिल करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतल्याचे पोलीस प्रवक्त्याने सांगितले. संचारबंदी शिथिल करण्यात आल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन नंतरच काश्मीरमधील अन्य भागांमध्ये लागू केलेली संचारबंदी शिथिल करायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
संचारबंदी शिथिल करण्यात आली असली तरी लोकांना त्याबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी लोकांची वर्दळ दिसत नव्हती.

Story img Loader