Lottery : कोणाचं नशीब कधी बदलेल याबाबत काहीही सांगता येत नाही. आता लॉटरीमध्ये अनेक लोक बक्षिसे जिंकतात आणि प्रसिद्धीच्या झोतात येतात. अनेकदा अनेकांना सहज लॉटरी लागल्याच्याही अनेक घटना पाहायलाही मिळाल्या आहेत. आता अमेरिकेतही एक असाच प्रकार पाहायला मिळाला आहे. एक व्यक्ती एनर्जी ड्रिंक खरेदी करण्यासाठी थांबला आणि त्याचं नशीब पालटलं. तबब्ल ८ कोटींची लॉटरी लागली एका व्यक्तीला लागल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे.

झालं असं की, अमेरिकेतील व्हर्जिनियामधील एक व्यक्ती एनर्जी ड्रिंक आणि स्क्रॅच-ऑफ तिकिटे खरेदी करण्यासाठी थांबला. त्या व्यक्तीने सहज तिकिटे खरेदी केली. मात्र, त्याला त्याचं नशीब बदलेल याचा काहीही अंदाज नव्हता आणि बघता बघता व्हर्जिनियामधील एका व्यक्तीने ८ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. नशीबाने त्या व्यक्तीला लॉटरी लागली मात्र, त्याचा आधी विश्वास बसला नाही. पण त्याला खरोखरच स्क्रॅच-ऑफ लॉटरीचे तिकीट खरेदी केले आणि नशीबाने लॉटरी लागली होती.

हेही वाचा : Bengaluru : महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले, बंगळुरूमध्ये धक्कादायक घटना; महिलेची आई म्हणाली, “घरमालकाने…”

यानंतर निकोलस फॉक्सने तब्बल ८.३ कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या जिंकलेल्या लॉटरीत ३० वर्षांमध्ये संपूर्ण १ दशलक्ष डॉलर घेण्याऐवजी करांनंतर $६२५,००० रुपयांच्या लॉटरीच्या रोख पर्याय निवडत रोख रक्कम स्वीकारली. दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, या व्यक्ती लॉटरीमध्ये ८.३ कोटींपेक्षा जास्त रुपये जिंकले आणि एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आला.