लव्ह जिहाद देशाच्या सुरक्षेपुढचे सर्वात मोठे संकट आहे असे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी केले आहे. पश्चिमेकडच्या देशात ‘लव्ह जिहाद’ला ‘रोमिओ जिहाद’ असे संबोधले जाते. आपल्या देशात या हा प्रकार वाढीला लागला आहे. लव्ह जिहाद ची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. अनेक मुलींनी माध्यमांसमोर येऊन त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती दिली आहे असेही जैन यांनी स्पष्ट केले. लव्ह जिहाद हे एक षडयंत्र आहे, वाममार्गाला गेलेल्या लोकांना यातून पैसा मिळतो असाही आरोप त्यांनी केला. ‘इंडिया टुडे’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देशात स्वतःला सेक्युलर मानणारा समाज लव्ह जिहादवर मूग गिळून गप्प आहे. जयपूरमध्ये झालेल्या एका अध्यात्मिक परिषदेत लव्ह जिहादशी संबंधित काही पत्रके वाटली गेली. हिंदू मुलींनी लव्ह जिहादच्या आहारी जाऊन त्यांचे आयुष्य पणाला लावू नये अशा आशायचा मजकूर या पत्रकांमध्ये होता. जे लोक शांतता प्रिय आहेत आणि गुण्या गोविंदाने राहतात त्यांच्यासाठी लव्ह जिहाद हे संकट आहेच मात्र यामुळे देशासमोरही मोठे संकट निर्माण झाले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.