उत्तरप्रदेशात शनिवारपासून सुरू होणाऱ्या भाजपच्या राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या हिंदूच्या धर्मांतराचा मुद्दा चांगलाच गाजण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या ‘धर्म जागरण मंच’ या संघटनेने ‘लव्ह जिहाद’ विरोधात मोहिम हाती घेतली होती. त्यानंतर आता भाजपच्या राज्यस्तरीय बैठकीतदेखील या मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार आहे. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून विवाहासाठी हिंदू मुलींचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान बनवण्यात येत असल्याचा आरोप या संघटनेने केला होता.
मथुरा येथे होणाऱ्या या बैठकीला भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह उत्तर प्रदेशातील पक्षाचे राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत २०१७ साली उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती आखण्यात येणार आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे वातावरण या मुद्यावरील चर्चेदरम्यान ‘लव्ह जिहाद’ आणि ‘हिंदूंच्या धर्मांतराच्या’ मुद्यावरही चर्चा होणार असून भविष्यात या समस्यांशी लढण्याची योजनाही या बैठकीदरम्यान आखण्यात येणार आहे. तसेच सहारणपूर, मोरादाबाद, मीरत आणि आंबेडकर नगर येथे झालेल्या जातीय हिसांचाराबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे.
उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर
उत्तरप्रदेशात शनिवारपासून सुरू होणाऱ्या भाजपच्या राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत 'लव्ह जिहाद'च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या हिंदूच्या धर्मांतराचा मुद्दा चांगलाच गाजण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या 'धर्म जागरण मंच' या संघटनेने 'लव्ह जिहाद' विरोधात मोहिम हाती घेतली होती.
First published on: 23-08-2014 at 12:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love jihad on official agenda of bjps up unit meet today