उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे झालेल्या भाजपच्या कायर्कारी समिती अधिवेशनात जरी लव्ह जिहादच्या मुद्याचा उल्लेख केला नसला तरी आम्ही उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत लव्ह जिहादच्या मुद्यावर भर दिल्याशिवाय राहणार नाही, असे गोरखपूरचे भाजप खासदार योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.  
उत्तर प्रदेशात १३ सप्टेंबरला मनपुरी लोकसभा व इतर ११ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी आदित्यनाथ यांच्यावर लव्ह जिहादच्या मुद्दय़ावर टीका  केली आहे. जातीय विद्वेष पसरवण्याचा भाजपचा डाव असून त्यामुळेच आदित्यानाथ यांना स्टार प्रचारक करण्यात आले आहे असे ते म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत बाजपेयी, केंद्रीय मंत्री कलराज मिश्र व खासदार आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशात प्रचार करणार असून योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, लव्ह जिहादचा धोका प्रथम केरळमधून सुरू झाला व नंतर तो उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात पसरला.
 उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या सरकारने या समस्येकडे कानाडोळा केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव व त्यांचे पिता मुलायम सिंग यादव यांनी एका समाजाचे तुष्टीकरण केले. राज्यात नेहमी दंगली होत आहेत. अखिलेश सत्तेवर आल्यानंतर हे होते आहे, तेथील कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे. संघ परिवाराच्या िहदुत्व कार्यक्रमाला पुढे नेणारा चेहरा म्हणून योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाहिले जाते. राज्यात बेकायदेशीर गोहत्या चालते, बांगलादेशी घुसखोर वाढत आहेत. सक्तीची धर्मातरे होत आहेत असा आरोप त्यांनी केला.
 वृंदावन येथे भाजप कार्यकारी समितीची बठक झाली पण त्यात मुस्लीम युवक िहदू मुलींना फूस लावून जाळ्यात ओढतात व त्यांचे धर्मातर करतात म्हणजेच लव्ह जिहादचा मार्ग वापरतात हा विषय चच्रेला आला होता, पण तो राजकीय ठरावाचा मुद्दा करू नये असे ठरवण्यात आले. परंतु योगी आदित्यनाथ मात्र पोटनिवडणुकीत हा प्रचाराचा मुद्दा करणार आहेत.

Story img Loader