LPG Gas Cylinder ऐन दिवाळीत देशभरात नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे. कारण आजपासून म्हणजेच १ नोव्हेंबरपासून तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या ( LPG Gas Cylinder ) दरात वाढ केली आहे. १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आता महागले आहेत. सणासुदीच्या काळात व्यावसायिक सिलिंडर ( LPG Gas Cylinder ) महाग झाला आहे. त्यामुळे आता या झळा सामान्यांनाच बसण्याची चिन्हं आहेत.

व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये ६२ रुपयांची वाढ

तेल कंपन्यांनी लागू केलेल्या ताज्या दरांनुसार गॅस सिलिंडरच्या ( LPG Gas Cylinder ) दरांमध्ये ६२ रुपयांची वाढ झाली आहे. वावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झालेली असली तर तेल कंपन्यांनी १४ किलोंच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या ( LPG Gas Cylinder ) दरात कोणतीही वाढ केलेली नाही. तेल कंपन्यांनी आणखी एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार भविष्यात विमानप्रवास महागण्याची शक्यता आहे. कारण तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरासोबतच विमानप्रवासात वापरल्या जाणाऱ्या ATF च्या किमतीतही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

new York schools Diwali holiday
न्यूयॉर्कमधील शाळांना पहिल्यांदाच दिवाळीची सुट्टी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tirupati Devasthanam
तिरुपती देवस्थानात हिंदू कर्मचारीच हवे, नवनियुक्त अध्यक्ष बी. आर. नायडू यांची भूमिका
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Karuna Sharma Cried
Karuna Sharma : उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने ढसाढसा रडल्या करुणा शर्मा, धनंजय मुंडेंना म्हणाल्या, “तू राक्षस…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Shaina NC Arvind Sawant
Shaina NC : अरविंद सावंत यांची जीभ घसरली; अपशब्द वापरल्याने शायना एन. सी. संतापल्या, म्हणाल्या, “महिलेला…”
Donald Trump Diwali Wishes
Donald Trump Wishes For Diwali : “मोदी आमचे चांगले मित्र, हिंदूंचं संरक्षण करू”, दिवाळीच्या शुभेच्छा देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आश्वासन!

ऑक्टोबर महिन्यातही व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत वाढ

१ ऑक्टोबरला व्यावसायिक वापराचा सिलिंडर ( LPG Gas Cylinder ) ४८ रुपयांनी महाग झाला होता. आता एक महिन्याने याच सिलिंडरची किंमत ६२ रुपयांनी महागली आहे. सुदैवाने घरगुती वापराच्या सिलिंडरमध्ये दरवाढ झालेली नाही.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा ताजा दर काय?

दिल्ली – १८०२ रुपये

कोलकाता – १९११ रुपये

मुंबई – १७५५ रुपये

चेन्नई – १९६५ रुपये

घरगुती गॅस सिलिंडरची नेमकी काय स्थिती?

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तेल कंपन्यांनी वाढ केली असली तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. म्हणजेच १४ किलो गॅस सिलिंडरच्या दरात सध्यातरी कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

घरगुती गॅस सिलिंडरचे दर काय?
दिल्ली – ८०३ रुपये

कोलकाता – ८२९ रुपये

मुंबई – ८०३ रुपये

चेन्नई – ८१९ रुपये

मागच्या चार महिन्यांत व्यावसायिक सिलिंडर किती महाग?

गेल्या चार महिन्यांत व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत १५० रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. दिल्लीत या काळात व्यावसायिक सिलिंडर १५६ रुपयांची वाढला तर मुंबईत सर्वाधिक वाढ झाली असून गेल्या चार महिन्यांत भावात १५६.५ रुपयांनी वाढ झाली. विशेष म्हणजे आजपासून व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली असली तरी घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्याने रेस्तराँमधली जेवणाच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो आणि रेस्तराँ जेवणाचे दर वाढवू शकतात. ज्याचा फटका रेस्तराँमध्ये जेवायला जाणाऱ्या सामान्यांना बसणार यात काही शंकाच नाही

विमानप्रवास महागण्याची शक्यता

ऐन दिवळीच्या काळात विमानातून प्रवास करणाऱ्यांना चांगलाच फटका बसू शकतो. कारण तेल कंपन्यांनी विमानासाठी लागणाऱ्या इंधनाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ नोव्हेंबरपासून विमानाचे इंधन म्हणजेच ATF च्या किमतीत तीन हजार रुपये प्रति किलो याप्रमाणे वाढ केली आहे.

Story img Loader