LPG Gas Cylinder Price : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. गॅस सिलिंडरच्या दरात आजपासून मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचे नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. या दरानुसार, आता व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ३९ रूपयांनी वाढली आहेत. त्यामुळे देशभरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना धक्का बसला असून याचा फटका सर्वसामान्यांनाही बसणार आहे.

आज जाहीर करण्यात आलेल्या नवीन दरानुसार, आता १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून १ हजार ६९१ रुपयांना मिळणार आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आजपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Gas leak causes fire in house in Chembur old person injured
चेंबूरमध्ये गॅस गळतीमुळे घराला आग, वृद्ध व्यक्ती जखमी
Daily Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरांत काय आहे दर?
Boy killed in gas cylinder blast karad
गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटामध्ये मुलगा ठार; उंडाळेतील भीषण दुर्घटना
How to check daily Petrol And Diesel rates
Petrol Diesel Rates In Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा दर

हेही वाचा : Haryana Mob Lynching : गोमांस खाल्ल्याच्या संशयातून बेदम मारहाण करत मजुराची हत्या; एकजण गंभीर, सात आरोपी गजाआड

दरम्यान, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रूपयांनी वाढ करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसणार आहे. आज जाहीर झालेल्या नव्या दरानुसार, आता संपूर्ण देशभरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर महागले आहेत. ही दरवाढ फक्त १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरामध्येच असणार आहे.

घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाली का?

आज (१ सप्टेंबर) गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर झाले आहेत. यामध्ये फक्त १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरामध्येच वाढ झाली आहे. मात्र, घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी फक्त व्यावसायिक सिलिंडरच्या दरामध्येच वाढ केली असून घरगुती १४ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दरम्यान, सर्वसामान्यांसाठी खर्चाचे नियोजन करण्यासाठी पगाराची १ तारीख महत्त्वाची असते. या १ तारखेला दर महिन्यात काही गोष्टी स्वस्त होतात तर काही गोष्टी महाग होतात. आता आज (१ सप्टेंबर) व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रुपयांनी वाढ झाल्यामुळे याचा फटका छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह सर्वसामान्यांनाही बसणार आहे.

जुलैमध्ये सिलिंडरच्या दरात झाली होती कपात

दरम्यान, जुलैमध्ये गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात झाली होती. जुलैमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर तब्बल ३० रूपयांनी स्वस्त करण्यात आले होते. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळला होता. मात्र, आता सप्टेंबरमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे.