LPG Cylinder Price Hiked: १ मार्च २०२३ पासून देशभरामध्ये काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. यानुसार एलपीजी सिलेंडर्सच्या दरामध्येही वाढ करण्यात आली आहे. सरकारद्वारे घेतल्या गेलेल्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचे मासिक आर्थिक नियोजन बिघडणार आहे. आजपासून एलपीजी सिलेंडर्ससह अन्य अनेक गोष्टींच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये ५० रुपयांनी वाढ करण्यात आले आहेत. यानुसार दिल्लीमध्ये १४.२ किलोग्रॅम सिलेंडरची किंमत ११०३ रुपये झाली आहे. कमर्शियल एलपीजी सिलेंडर्सच्या किंमतीमध्ये ३५०.५० रुपयांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी या गॅस सिलेंडर्सची किंमत २,११९.५० रुपये झाली आहे.

२०२२ मध्ये काही महिन्यांपूर्वी घरगुती वापरातील गॅस सिलेंडरच्या दरात १५० रुपयांनी केली गेली होती. तेव्हा व्यावसायिक वापरातील एलपीजी सिलेंडर्सची किंमत २५ रुपयांनी वाढवण्यात आली होती. ६ जुलै २०२२ पासून एलपीजी सिलेंडर्सच्या दरामध्ये बदस करण्यात आला नव्हता. होळीपूर्वी या दरांमध्ये वाढ होण्याची शंका व्यक्त केली जात होती.

आणखी वाचा – १ मार्च २०२३ पासून सर्वसामान्यांचं आर्थिक गणित बिघडणार? सरकारच्या नियमांमध्ये ‘या’ बदलांमुळे होणार परिणाम

स्थानिक करांवरुन घरगुती गॅस सिलेंडर्सच्या किंमती अवंलबून असतात. राज्यानुसार त्यांच्या किंमतींमध्ये बदल पाहायला मिळतात. तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरच्या दरांबाबत माहिती प्रसिद्ध करत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतींचा परिणाम देशांतर्गत गॅस सिलेंडर्सच्या किंमतींवर होत असतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lpg gas cylinder price hiked by 50 rs now its cost will be 1103 rs in delhi know more details yps