LPG Price Hike: महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आधीच इतके वाढले असताना आता सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती सिलेंडरच्या (LPG Cylinder) किंमतीही वाढवल्या आहेत. १४ किलोच्या अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात २५ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता घरगुती अनुदानित एलपीजी सिलेंडरसाठी ८३४ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत.

दिल्लीमध्ये आज १४.२ किलोच्या सिलेंडरसाठी ८०९ ऐवजी ८३४ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत. तर मुंबईतही इतकेच पैसे मोजावे लागणार आहेत. दुसरीकडे कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरचा दर ८३५ रुपये ५० पैशांवरुन ८६१ रुपये झाला आहे तर चेन्नईत एलपीजी सिलेंडरसाठी ८५० रुपये ५० पैसे इतका दर आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एलपीजी सिलेंडरचा दर ८७२ रुपये ५० पैसे इतका झाला असून गुजरातमधील अहमदाबादमध्ये ८४१ रुपये ५० पैसे झाला आहे.

सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात. याआधी १ मे रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केला नव्हता. तर एप्रिल महिन्यात १० रुपयांनी दर कमी करण्यात आले होते. तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये हे दर वाढले होते. दरम्यान या वर्षभरात एलपीजी सिलेंडरच्या दरात एकूण १४० रुपयांची वाढ झाली आहे.

Story img Loader