निवडणुकीच्या निकालांमध्ये सरकारचे राजकीय गणित कोलमडत असताना आता महागाईने त्रासलेल्या सर्वसामन्य नागरिकांचेही आर्थिक गणित पुन्हा एकदा कोलमडणार आहे. देशभरात घरगुती सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.
विनाअनुदानित सिलिंडर ४.२१ रुपयांनी तर अनुदानित सिलिंडर ३.४६ रुपयांनी महागला आहे. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपया अजूनही दुबळा आहे. त्यात इराण आणि पश्चिमेकडील देशांत अणुकरारावरून वाद सुरू असल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत असल्याने भारतात पेट्रोलच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या महिन्यातच डिझेलच्या दरामध्येही वाढ झाली होती. त्यात सरकारने डिझेलचे दर नियंत्रणमुक्त करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामन्यांना आणखी महागाईच्या भडक्याला सामोरे जावे लागणार आहे.

Story img Loader