अनुदानित घरगुती सिलिंडरच्या दरात तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून बुधवारी घेण्यात आला. सरकारकडून सिलिंडर वितरकांना देण्यात येत असलेल्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी गेल्या आठवड्यात वितरकांच्या कमिशनमध्ये केंद्र सरकारने तीन रुपयांची वाढ केली. त्यानुसार १४.२ किलोग्रॅम सिलिंडरमागे ४३.७१ रुपयांचे कमिशन वितरकांना मिळत आहे. याला अनुसरून ग्राहकांना मिळणाऱया सिलिंडर दरातही वाढ करण्यात आली आहे.
आता करण्यात आलेल्या दरवाढीमुळे दिल्लीत १४.२ किलोग्रॅमचा अनुदानित सिलिंडर ४१७ रुपयांना मिळणार आहे. मुंबईमध्ये तो ४५२ रुपयांना मिळेल. सरकारकडून प्रत्येक ग्राहकाला 12 अनुदानित सिलिंडर दिले जातात. त्यानंतर ग्राहकाला विनाअनुदानित सिलिंडर विकत घ्यावा लागतो. विनाअनुदानित सिलिंडरची किंमतही यामुळे ८८० रु. वरून ८८३.५० रुपये इतकी झाली आहे.
घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ
सरकारकडून सिलिंडर वितरकांना देण्यात येत असलेल्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
First published on: 29-10-2014 at 02:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lpg rate hiked by rs 3 per cylinder