येणारी लोकसभा निवडणूक हे काँग्रेस आणि मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार निवडणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधील ‘महाभारत युद्ध’ ठरणार आहे, असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम यांनी केले आह़े  शनिवारी रात्री पक्षाने काँग्रेसने येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होत़े
संघ जातीय आधारावर लोकांना विभागून एका वाईट गोष्टीचे बीज रोवण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली़  गुजरातमध्ये चकमकीत अनेक मुस्लीम युवक मारले गेले आहेत, असा दावा करीत चिदंबरम यांनी सांगितले की, ते गृहमंत्री होते तेव्हा चकमकींना कधीच परवानगी देत नसत़  गुन्हेगार किंवा अतिरेकी गोळीबार करीत नसतील तर त्यांना जिवंतच पकडा, असे आदेश तेव्हा दिल्याचेही त्यांनी सांगितल़े

Story img Loader