लखनऊ येथील एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात सहा जण ठार तर, १४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
लखनौमधील मोहनलालगंज भागात असलेल्या फटाका कारखान्यात आज सकाळी हा स्फोट झाला. या स्फोटात कारखान्यातील मजुरांपैकी सहा जण मृत्युमखी पडले आहेत तर १४ जण जखमी झाले. पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवानघटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. फटाक्यांचा हा कारखाना अवैधरित्या चालविण्यात येत होता, असे समजते. अद्याप स्फोटाचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
(संग्रहित छायाचित्र)